चिकन सोबत या 3 गोष्टी खाणे आरोग्यासाठी घातक आहे

आपल्याकडे बहुतांश लोकांना चिकन खाण्याची फार आवड असते. चिकन थाळी पासुन चिकन बिर्याणी, लॉलीपॉप, मोमोज, रोल्स इत्यादि अनेक चिकनचे पदार्थ खाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. चिकन खात असताना लोक तोंडी लावायला कांदा, काकडी, वगैरे वेगवगेळे सॅलडही वापरतात.

पण असेही बरेच लोक आहेत जे नकळतपणे चिकनसोबत आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या गोष्टीही खात असतात. आज आपण चिकनसोबत कोणत्या गोष्टी खाणे अपायकारक आहे ते पाहणार आहोत. यानंतर चुकूनही चिकन सोबत त्या गोष्टी सेवन करू नका.

१) दही :

हो, तुम्ही बरोबर वाचलं ! चिकनसोबत दही खाऊ नये. यामागचे कारण असे की चिकन आणि दही हे दोन परस्परविरोधी गुणधर्म असणारे अन्नपदार्थ आहेत. चिकनमध्ये उष्णता असल्याने ते शरीराला उष्णता देते तर दही थंड असल्यामुळे ते पोटात गेल्यावर थंडावा देते.

जेव्हा चिकन आणि दही सोबतच खाल्ले जातात, तेव्हा दोन्हींचे घटक आपसात मिसळतात, ज्याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. पोटाशी संबंधित अनेक आजार चिकन आणि दही एकत्र खाल्ल्याने होऊ शकतात.

२) दूध :

चिकन खाल्ल्यानंतर चुकून सुद्धा कधी दुधाचे सेवन करु नका. कारण दुधामध्ये असणारे अनेक पोषक घटक आणि चिकन मध्ये असणारे पोषकी घटक एकत्र आल्यास शरीरावर त्याचा घातक परिणाम देखील होऊ शकतो.

दूध आणि चिकन एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात वेगवगेळे साईड इफेक्ट देखील होऊ शकतात. परिणामी शरीरावर पांढरे डाग दिसतात. म्हणून चिकन आणि दुधाचे एकत्र सेवन करणे विसरू नका.

३) मासे :

मांसाहारी लोकांमध्ये चिकन खाणाऱ्या व्यक्ती जशा आहेत, तशाच मासेही खाणाऱ्या आहेत. काहीजणांना तर चीक आणि मासे दोन्ही आवडतात. पण अशा लोकांना विनंती आहे की चिकन आणि मासे कधीही एकत्र खाऊ नयेत.

चिकन आणि माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळत असली तरी दोघांमधील प्रोटिन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. चिकन आणि मासे दोन्ही सोबत खाल्ले तर प्रथिनांच्या एकमेकांशी होणाऱ्या क्रियेमुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *