ट्रेनमध्ये मृत आत्म्यांच्या नावाने बुक केली जाते सीट बुक, कुटुंबातील लोक देतात पहारा

नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर गाजलेल्या आहट नावाच्या हॉरर सिरीयल मधील तो “खजान मेल” चा एपिसोड आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पहिला असेल. आजही आपल्याला तो एपिसोड आठवून अंगावर काटा येत असेल.

ट्रेनमधील आत्म्यांशी संबंधित तो भाग होता. ते झालं सिरियलविषयी, परंतु आज तशाच ऐकावे ते नवलच या प्रकारातली एक बातमी आली आहे. भारतात रेल्वेमध्ये चक्क मृत आत्म्यांच्या नावाने सीट बुक केल्या जातात. आपला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. पाहूया आत्म्यांच्या ट्रेन प्रवासाबद्दल…

कशासाठी केली जाते ही ट्रेन बुकिंग

तर विषय असा आहे की बिहार मधील गया या ठिकाणी पितृ पंधरवडा काळात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी केले जातात. गयाच्या स्मशानातील पवित्र माती पितृदंड तयार करण्यासाठी वापरली जाते.

देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो हिंदू लोक आपल्या पितरांचे श्राद्ध आणि त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी गयाला येत असतात. पिंडदानासाठी ते पिंडाच्या रुपात नारळ आणि कळकापासून बनवलेले पितृदंड रेल्वेत चक्क झोपवून आणले जातात. या पितरांसाठीच रेल्वेमध्ये सीट बुक केली जाते.

कुठे केली आत्म्याच्या नावाने ट्रेनमध्ये सीट बुकिंग

ओडिसा मधील कांटामांझी इथून पिंडदान करण्यासाठी आलेल्या समूहाने आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्याच्या नावाने रेल्वेत तिकीट बुक त्यांना गयाला आणले होते. त्यांचं म्हणणं आहे की आमची आमच्या पूर्वजांवर श्रद्धा आहे.

ते आपल्यासोबत सर्वसाधारण वाटणाऱ्या दांड्याचेही (ज्याला ते पितृदंड म्हणतात) तिकीट काढून त्याला आपल्याशेजारी सीटवर ठेवून गयापर्यंत आणतात. एवढेच नाही तर कोणी त्यांना त्रास देऊ नये म्हणून कुटुंबातील लोक पहारा देतात. ट्रेनमधील तिकीट चेकरने त्याबद्दल विचारले तर ते सरळ तिकीट समोर करतात.

मित्तल नावाचे कुटुंब मागच्या सात पिढ्यांपासून ओडिशाच्या कांटामांझीहुन गयाला पिंडदानासाठी येतात. कधी ट्रेनने तर कधी बसने येतात, पण येताना पितृदंडाचे तिकीट अवश्य काढतात. पितृदंडासाठी स्वतंत्र आरक्षण असते. घरून पंडितजी जे कापड देतील, ते ट्रेनच्या सीटवर अंथरून पितृदंडाला त्यावर झोपवून आणले जाते. कुटुंबातील लोक आपापल्या पितृदंडाला पहारा देतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *