सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक कधी होणार? वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे.

त्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या ९० जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार असून १.८ लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया २ नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

असा असेल विधानसभा निवडणूक कार्यक्रम-

अर्ज भरण्याची तारीख : २७ सप्टेंबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ४ ऑक्टोबर
अर्ज छाननी : ५ ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ७ ऑक्टोबर
मतदानाची तारीख : २१ ऑक्टोबर
निकाल : २४ ऑक्टोबर

साताऱ्यात लोकसभेसाठी कधी होणार पोटनिवडनुक-

आज विधानसभेचं बिगुल वाजलं. विधानसभेतसोबत देशभरात ६६ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. पण धक्कादायक म्हणजे यामध्ये सातारच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या समावेश नाहीये. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्याची लोकसभा निवडणूक विधानसभेसोबतच होईल अशी शक्यता होती.

पण निवडणूक आयोगानं आज संपूर्ण कार्यक्रम जाहीर करताना यात सातारची लोकसभा पोटनिवडणूक होणार नाहीये असे घोषित केले आहे. एखाद्या खासदाराने राजीनामा दिल्यानंतर त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबत पोटनिवडणूक होणे अपेक्षित असते. पण हि निवडणूक जाहीर न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे उदयनराजेंनी भाजप प्रवेश करताना विधानसभा निवडणुकीसोबत पोटनिवडणूक घ्यावी हि अट घातली होती. त्यांनी यासाठी दिल्लीमध्ये घाई घाईत राजीनामा देखील दिला होता. त्यामुळे हि निवडणूक विधानसभेसोबत होणे अपेक्षित होते पण असे झाले नाही. आता हि पोटनिवडणूक कधी होते हे बघावे लागेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *