KBC मध्ये बबिता ताडे १ करोड रुपये जिंकल्या तरी मिळणार फक्त एवढे लाख!

कोण बनेगा करोडपती मध्ये गुरवारी प्रदर्शित झालेल्या भागात महाराष्ट्राच्या बबिता ताडे १ करोड रुपये जिंकल्या ! त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. शाळेत खिचडी शिजवनाऱ्या बबिताताई रातोरात करोडपती झाल्या.

बबिता ताडे अमरावती जिल्ह्यातील पंचफुलाबाई हरणे खिचडी शिजविण्याचे काम करतात याच विद्यालयात त्यांचे पती शिपाई आहे. बबिताताई यांचे शिक्षण पदवी पर्यंत पूर्ण झालेले आहे त्या नंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी एक वर्ष शिक्षण घेतले. परंतु पोटाची भूक मोठी असते त्यांनी कुटुंबाच्या जवाबदारी वाढल्यामुळे शिक्षण बंद केले.

या काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील केला आहे. नंतर त्यांनी कौटुंबिक जवाबदारीमुळे पूर्ण वेळ आपल्या कामाला दिला. केशव तायडे हे बबिताताईचे पती मुळचे अकोला जिल्हातील चोहोटा येथील आहे. परंतु नौकरीमुळे मागील २३ वर्षापासून ते अंजनगाव येथे स्थायिक झालेले आहे.

१५०० रुपये महिन्यांनी काम करणाऱ्या बबिता ताडे ४५० मुलासाठी रोज खिचडी बनवीत होत्या. पैसे जिंकल्यावर काय करणार हे विचारल्यावर बबिताताईनि सांगतले कि त्यांना मंदिर बांधायचे आहे, मुलांना चांगले शिक्षण द्याचे आहे आणि पूर्ण घरात एकच मोबाईल असल्याने एक चांगला फोन पहिले घ्याचा आहे. हे ऐकल्यावर अमिताभ बच्चन यांनी स्वतः त्यांना एक स्मार्ट फोन गिफ्ट केला.

हि गोष्ट ऐकून अमिताभ यांनी स्वतः बबिताताईना एक स्मार्टफोन गिफ्ट केला. परंतु त्यांनी सांगितले कि आता हा फोन त्यांना वापरता येत नाही घरी गेल्यावर मुलाकडून शिकून घेणार. मागील अनेक वर्षापासून त्या केबीसी मध्ये येण्याचा प्रयत्न करत होत्या.

एक करोड जिंकूनही मिळणार फक्त एवढे लाख-

KBC मध्ये करोड रुपये जरी एखादा व्यक्ती जिंकला तरी त्याला ती संपूर्ण रक्कम त्या विजेत्याला मिळत नाही. KBC मध्ये बबिता ताडे या १ करोड रुपये रक्कम जिंकल्या. कोणताही प्रतिस्पर्धी जी रक्कम जिंकतो ती रक्कम अमिताभ बच्चन त्याच्या अकाउंट मध्ये ऑनलाईन पाठवतात हे शो मध्ये दाखवले जाते.

पण खरोखर एवढी रक्कम त्या विजेत्याला मिळत नाहीत. त्या जिंकलेल्या पैशांवर वेगवेगळे टॅक्स लावले जातात. त्यामुळे विजेत्याला संपूर्ण जिंकलेले पैसे मिळत नाहीत. टीव्ही शो मधून जिंकलेल्या रकमेवर तब्बल ३०.९ टक्के TDS च्या स्वरूपात टॅक्स लागतो. दहा लाखाच्या वर रक्कम जिंकणाऱ्या विजेत्याला टॅक्स, सरचार्ज आणि सेझ मिळून एकूण ३३.९ टक्के टॅक्स भरावा लागतो.

त्यामुळेच बबिता ताडे एक करोड रुपये जिंकल्या असल्या तरी त्यांचे ३३.९ लाख हे टॅक्सच्या स्वरूपात कपात झाले. त्यामुळे त्यांच्या हातात फक्त ६६ लाख रुपये मिळणार आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *