यामुळे मावळल्या विक्रम लँडरशी संपर्क होण्याच्या उरल्या सुरल्या आशा!

भारताच्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि इस्रोसह देशवासीयांचा उत्साह निराशेत बदलला.

भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला होता. हा संपर्क तुटला होता तरी १४ दिवस संपर्क होऊ शकतो असे इस्रो प्रमुख के सिवन यांनी सांगितले होते. त्यामुळे देशवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हा संपूर्ण चांद्रयान-२ मिशनचा केवळ ५% भाग होता. या मोहिमेचा ९५% भाग म्हणजेच ऑर्बिटर यशस्वीरीत्या चंद्राभोवती फिरत आहे. या ऑर्बिटरने विक्रम लँडरचे फोटो देखील काढले होते. त्यानंतर इस्रोने लॅण्डर सोबत संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला पण अजून यात यश आले नाही.

विक्रम लँडरचे लोकेशन शोधण्यासाठी नासाची देखील मदत घेण्यात आली. नासाच्या ऑर्बिटरच्या मदतीने विक्रम लँडरचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला गेला. पण नासाचे ऑर्बिटर देखील यामध्ये अयशस्वी ठरले.

७ सप्टेंबरला चांद्रयान २ ने चंद्रावर हार्ड लँडिंग केली होती. या लँडिंगच्या वेळी लँडरच्या ४ थ्रस्टर पैकी एक थ्रस्टर वाकला होता. त्यामुळे त्याचा संपर्क तुटला होता. चंद्रावर लुनार डे संपल्यामुळे अंधार झाला आहे. त्यामुळे आता विक्रमचे फोटो पण काढता येत नाहीयेत.

विक्रम लँडरशी संपर्क होण्याच्या उरल्या सुरल्या आशा मावळल्या –

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र झाली आहे आणि तिथे अंधार झाला आहे, ज्यामुळे भारताच्या विक्रम लँडरसोबत संपर्क होण्याच्या उरल्या सुरल्या आशा देखील मावळल्या आहेत. चंद्रावर रात्र झाल्यानंतर आता एक महिनाभर हि रात्र राहणार आहे. त्यामुळे इस्रोला संपर्क करण्याचा काही प्रयत्न किंवा त्याबद्दल माहिती आता एक महिन्यानंतरच मिळणार आहे.

चंद्रावर मायनस १७३ डिग्री तापमान आहे. या तापमानात राहिल्यानंतर आता एक महिन्यानंतरच नासा विक्रमची परिस्थिती सांगू शकते. नासाच्या एलआरओने लँडिंग केलेल्या जागेचे फोटो घेतले होते पण विक्रम पडलेल्या जागेची अधिकृत जागा माहिती नव्हती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *