चंद्र थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरतो तेव्हा! मलिष्काच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ

मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’, असे म्हणत मुंबईकरांच्या समस्या मांडणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देखो चाँद आया जमीन पर असे म्हणत तिने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेची खिल्ली उडवत रस्त्यांच्या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण चंद्रावर पोहोचलो नाही म्हणून काय झालं. चंद्र तर थेट मुंबईतल्या रस्त्यावर उतरलाय, अशा आशयाचं गाणं तयार करुन आर.जे मलिष्कानं पुन्हा एकदा खड्ड्यांवरुन मुंबई महापालिका आणि प्रशासनाची पोलखोल केली आहे. यामध्ये ती सजलेल्या अनोख्या रुपात दिसत आहे.

मागीलवर्षी मलिष्काचे “मुंबई खड्ड्यात” “मुंबई तुझा बीएमसी पे भरोसा नाही का ?” हे गाणे फारच गाजलं होते.

दोन वर्षांपूर्वी मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का? असं म्हणत पालिकेवर उपहासात्मक टीका करणाऱ्या आरजे मलिष्काने गेल्यावर्षीही खड्ड्यांवर गाणं तयार केलं होतं. ते गाणं देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. सैराट सिनेमातील झालं झिंग झिंगाट गाण्याच्या धर्तीवर मलिष्कानं ‘गेली गेली मुंबई खड्ड्यात’ गाणं तयार केलं होतं. आता पुन्हा या अनोख्या रुपात येत मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं चांगलंच व्हायरल होत आहे.

मलिष्कानं २.४० मिनिटांचं हे गाणं फेसबूक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलं असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र मलिष्काचं हे नवीन गाणं आता महानगरपालिकेपर्यंत पोहोचतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खालील लिंक वर आपण हे गाणे बघू शकता.

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मलिष्काला मुंबईची समज नाही असं म्हणलं आहे. पावसाच्या दिवसांमध्ये दरवर्षी रस्त्यावरील खड्डे आणि त्यात साचणारे पाणी अशा अनेक समस्या निर्माण होतात आणि या साऱ्याचा त्रास सहन करावा लागतो तो म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना. यासाठी हे गाणे तिने तयार केले आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *