पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीसाठी लोक रस्त्यावर, वाचा काय आहे प्रकरण

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बीबी असिफा डेंटल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका हिंदू मुलीचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. नम्रता चंदानी असे त्या विद्यार्थिनीचे नाव होते. ती कॉलेजच्या बिडीएस वर्गात लास्ट सेमिस्टरची विद्यार्थिनी होती. होस्टेल मध्ये हा प्रकार घडला होता.

नम्रता पाकिस्तान मधील घोटकी भागातील मीरपूर मथेलो इथली रहिवासी होती. शिक्षणासाठी ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहयला गेली होती. धर्म परिवर्तनासाठीच नम्रताला त्रास दिला गेला आणि तिने नकार दिल्यामुळे तिच्या सोबत असे करण्यात आले असा आरोप नम्रताच्या आईवडिलांनी केला आहे. तिचा भाऊ डॉ.विशाल सुंदर याने आम्ही अल्पसंख्यांक आहोत, कृपया आम्हाला न्याय द्या असे भावनिक आवाहन केले आहे.

शोएब अख्तरनेही मागीतला नम्रतासाठी न्याय

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही नम्रता चंदानीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. ट्विटरवर ट्विट करुन शोएबने म्हटले आहे की, “निष्पाप अशा नम्रता कुमारी या मुलीच्या संशयास्पद मृत्यूबद्दल वाचून खूप दुःख झाले. मला आशा आहे की तिला न्याय मिळेल आणि गुन्हेगार पकडले जातील. माझं काळीज प्रत्येक पाकिस्तानी नागरिकासोबत धडकते भले तो कोणत्याही धर्माचा असो. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो.”

पाकिस्तानचे नागरिक नम्रतासाठी उतरले रस्त्यावर

नम्रता चंदानीच्या संशयास्पद मृत्यूनंतर पाकिस्तानमधील वातावरण पेटले असून कराचीतील लोक रस्त्यावर उतरून ह त्येचा निषेध नोंदवत आहेत. सोशल मीडियावरही पाकिस्तान मधील नेटिझन्स खु न्यांना पकडण्याची मागणी करत आहेत. JusticeForNamrataChandani असा कॅम्पेनसुद्धा राबवला जात आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट व्हायरल

एका बाजूला नागरिकांमध्ये नम्रता चंदानी या २५ वर्षीय मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे रोष निर्माण झाला असतानाच रिपोर्टही व्हायरल झाला आहे. पोस्टमार्टमच्या अहवालानुसार नम्रता चंदानी यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. तिच्या उजव्या पायावरही जखमा आहेत.

तिच्या शरीराच्या अनेक भागांवर जखमा सापडल्या आहेत. तथापि स्थानिक पोलिसांचे असे म्हणणे आहे की, “या मृत्यूला खू न म्हणणे फार घाईचे होईल. नम्रताने नेमके काय केले, हे आताच सांगणे कठीण आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *