बेरोजगारांसाठी गुगल एक चांगली बातमी घेऊन येत आहे, लवकरच करणार नवीन ऍप लाँच

गुगल भारताच्या जॉब सर्च मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. लवकरच गूगल एक अ‍ॅप लॉन्च करणार आहे. जिथे लोक त्यांच्या एंट्री लेव्हलचा जॉब शोधू शकतील. अ‍ॅपचे नाव आहे Kormo ! इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार एंट्री-लेव्हल जॉब सर्च करण्यासाठी गुगलने जॉब आणि करिअर संबंधीचे अ‍ॅप्लिकेशन Kormo सोबत भागीदारी केली आहे.

तथापि भारतातील पायल हा प्रोजेक्ट या वर्षाच्या सुरूवातीपासूनच सुरू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात जॉब देण्याबाबत संशोधन चालू आहे. हे ऍप २० सप्टेंबर रोजी दिल्लीतील गुगल इव्हेंटमध्ये लाँच केले जाईल.

तसे बघायला गेले तर मार्केटमध्ये जॉब सर्चसाठी आधीच भरपूर अ‍ॅप्स आहेत. अशा परिस्थितीत Kormo ऍप या सर्वांपेक्षा वेगळे कसे असेल आणि त्याची वैशिष्ट्य काय असतील हा प्रश्नच आहे. खरं तर Kormo अशाप्रकारचे जॉब शोधण्यात मदत करेल, ज्यांविषयी फारच क्वचित ऑनलाईन पोस्ट केल्या जातात. जास्त करुन अशा नोकऱ्या ज्या संघटित क्षेत्रात नाहीत आणि ज्यांविषयी सहजासहजी माहिती मिळत नाही, त्या नोकऱ्या शोधण्यासाठी गुगल मदत करेल.

Kormo सप्टेंबर २०१८ मध्ये प्रथम बांगलादेशात लाँच झाला होता. या वर्षाच्या सुरूवातीस इंडोनेशियामध्येही याची सुरूवात करण्यात आली होती. Kormo म्हणजे बंगाली भाषेत ‘काम’. बांगलादेश आणि इंडोनेशियात Kormo चे लक्ष केवळ रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक यासारख्या क्षेत्रातील नोकर्‍यावर आहे. Kormo हा गुगलच्या Next Billion User या आगामी उपक्रमाचा भाग आहे.

या प्रकल्पाशी संबंधित बिक्की रसेल असे म्हणतात, “हे ऍप सुरू केल्यापासून ५०००० लोकांना शेकडो संस्थांमध्ये नोकरी देण्यात यश आले आहे. विशेषत: प्रवेश स्तरावरील नोकरी शोधत असलेल्यांना या ऍपने मदत केली आहे. कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळवणे फारच अवघड आहे. ही सेवा आता भारतासारख्या बेरोजगारांची संख्या जास्त असणाऱ्या देशात द्यायची आहे.”

२०१७-१८ मधील सरकारच्या अखिल भारतीय सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे ४४ लाख ८० हजार उच्चशिक्षित पदवीधर पदवी घेऊन बाहेर पडतात. यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा समावेश केला नाही. त्यांची संख्या सुमारे १० लाख आहे.

भारतीय कर्मचारी महासंघाच्या मते देशातील एकूण कामगारांपैकी ८३.८% लोक अनौपचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत. Kormo ला भारतात Quiker आणि OLX सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल, ज्यांचा बाबा जॉब आणि आसनजॉब्जवर ताबा आहे. याशिवाय गुगलला बर्‍याच मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. टेक महिंद्रा सरल रोजगार, क्विस कॉर्फ आणि इतर कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *