इथे केली जाते नरेंद्र मोदीची पूजा, देवासोबत आहे नरेंद्र मोदी यांची मूर्ती..

राम मंदिर कधी होणार माहिती नाही परंतु त्या अगोदर काही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांनी मोदींना देवाच्या ठिकाणी बसविले आहे. नरेंद्र मोदी यांचा काल ६९वा वाढदिवस झाला आणि त्यानिमित्त हि घटना घडली आहे. हनुमान मंदिरात त्यांना हि जागा देण्यात आली आहे.

बंगाली स्थानांतरीत झालेल्या हिंदू मजुरांनी या मंदिराचे निर्माण केले आहे. २०१४ साली जेव्हा मोदी सत्तेत आले तेव्हापासून या भागाचा विकास होत आहे त्यामुळे त्यांचे उपकार फेडण्यासाठी हि मूर्ती स्थापन केली आहे असे सांगण्यात आले आहे.

बिहार मधील कटीहार जिल्ह्यातील आनंदपूर येथील ग्रामस्थांनी या मंदिराचे निर्माण केले आहे. त्यासोबत त्यांनी केक कापून नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देखील साजरा केला आहे आणि देवाकडे त्यांना दीर्घ आयुष्य मिळावे अशी प्रार्थना केली आहे.

गावाचा मुखिया लालन विश्वास म्हणतो कि ” भारतातील सर्वात मागास भाग आमचा आहे. स्वतंत्र मिळाल्यापासून आम्हाला रस्ता कसा असतो हे सुध्दा माहिती नव्हते. सरकारी अधिकारी आणि अनेक नेत्यांना विनंती करून सुध्दा आमचा आवाज कधी त्यांच्या पर्यंत पोहचला नाही. आम्ही सर्व आशा सोडल्या होत्या परंतु नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्याबरोबर आम्हाला रस्ता आणि दोन वर्षात विद्युत सुविधा देखील देण्यात आली होती.”

या गोष्टीमुळे नरेंद्र मोदी त्यांना देव आहे आणि देवासोबत जागा देणे त्यांना योग्य आहे असे विश्वास लालन सांगतात. या अगोदर राजकोट मध्ये देखील नरेंद्र मोदीचे एक मंदिर बांधण्यात आले होते. यावरच गावातील लोक समाधानी नाहीतर या पेक्षा मोठे मंदिर बांधायचे आहे असा त्यांनी निर्धार केला आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *