हि मालीका बघुन अनेक महिला पोलीस दलात आल्या

आज आपण सर्वजण जुन्या कालची आठवण काढत असतो, कारण गेलेला काळ आपल्यासोबत अनेक सुंदर गोष्टी घेऊन गेला. आज त्या काळातील गोष्टी केवळ आठवणींच्या रूपात आपल्या सोबत आहेत. वेळ मिळेल हे आठवणींचे गाठोडे उलगडायला आपल्याला आवडत असते.

याच आठवणींच्या गाठोड्यामध्ये दूरदर्शनच्या अनेक मालिकांचाही समावेश आहे. अशा मालिका, ज्यातून लहानपणीच आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. त्यापैकीच एक मालिका म्हणजे उडाण ! चला तर मग आठवणींची सहलीला जाऊन येऊया…

दूरदर्शनवर गाजलेलया उडान मालिकेचा परिचय

उडान ही मालिका भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या आयुष्यावर आधारित होती. या मालिकेचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका कविता चौधरी यांनी केली होती. त्यासोबतच विक्रम गोखले आणि शेखर कपूर यांचाही या मालिकेत समावेश होता.

१९८९ ते १९९१ दरम्यान दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित झाली होती. IPS परीक्षेची तयारी करणारी मुलगी, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारी मुलगी असा या मालिकेचा मध्यवर्ती विषय आहे.

घरी बसलेल्या महिलांना IPS बनण्याची प्रेरणा देणारी मालिका

महिला सक्षमीकरण विषयावरील कदाचित ही भारतातील पहिलीच दूरदर्शन मालिका होती. एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी IPS बनण्याचे केवळ स्वप्न पाहत नाही तर ते सत्यात उतरवते, हा प्रवास या मालिकेत रेखाटला आहे. लोकांना आणि विशेषतः महिलांना ही मालिका खूप आवडली.

या मालिकेतून घरी बसलेल्या कित्येक महिला, मुलींना भविष्यात IPS चे स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. हरियाणातील भिवानी येथील संगीता कालिया यांना उडान मालिकेतून प्रेरणा भेटली आणि त्या IPS बनल्या असे त्या स्वतः सांगतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *