कशामुळे होतो ब्लड कॅन्सर ? लक्षणे आणि काळजी

सर्वसाधारणपणे कर्करोगात शरीराच्या विशिष्ठ अवयवात गाठ येऊन तिच्यात अनियमतरित्या वाढ होत असल्याची लक्षणे दिसताच योग्य ते उपचार घेता येतात. पण ब्लड कॅन्सरमध्ये असे नसते. हा कॅन्सर जिथून रक्ताच्या पेशी निर्माण होतात अशा बोन मॅरोपासून सुरु होतो.

ब्लड कॅन्सरमध्ये रक्तपेशींच्या विकासात किंवा कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शरीरात रक्ताचे जे कार्य असते, उदा.शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे, रोगप्रतिकार, रक्तस्राव रोखणे इत्यादि कामात अडथळा निर्माण होतो. ब्लड कॅन्सर हा सहाव्या क्रमांकाचा प्राणघातक आजार आहे.

ब्लड कॅन्सरचे तीन प्रमुख प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा. ल्युकेमियामध्ये शरीरात इतक्या अतिरिक्त प्रमाणात पांढऱ्या रक्तपेशी तयार होतात, की ज्यामुळे आपले शरीर संक्रामक रोगांचा प्रतिकार करु शकत नाही. लिम्फोमामध्ये आपल्या शरीरातील लिंफोसाइट्स पेशींवर प्रभाव पडून रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

मायलोमामध्ये आपल्या प्लाझ्मा पेशी प्रभावित होतात, ज्यामुळे आपले शरीर संक्रमणाविरोधात लढू शकत नाही. हे तिन्ही प्रकारचे कॅन्सर काहीप्रमाणात एकसारखेच असले तरी ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर प्रभाव टाकत असतात.

ब्लड कॅन्सरची लक्षणे

१) लहानशा जखमेतुन जास्त रक्त वाहणे. २) दिर्घकाळपर्यंत सांधेदुखी राहणे. ३) त्वचेवर सतत खाज किंवा गाठी येणे. ४) अचानकपणे जलदगतीने शरीराचे वजन कमी होणे. ५) श्वास घेण्यास त्रास होणे. ६) शरीरात अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे.

७) रात्रीच्या वेळी खूप घाम येणे. ८) वारंवार सरसर्गजन्य रोग होणे. ९) पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स अचानक कमी किंवा जास्त होणे. १०) सातत्याने हिमोग्लोबिन कमी होणे.

ब्लड कॅन्सरपासून बचावाच्या टिप्स

१) लाइफस्टाइल हेल्थ असावी. २) ब्लड कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स युक्त फळ आणि भाज्यांचा समावेश करावा. ३) रोज अर्धा तास व्यायाम करावा. ४) तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

५) धूम्रपान करु नका. धुम्रपानामुळे शरीरात विष तयार होते. त्यामुळे शरीरात ब्लड कॅन्सर सेल्सची वाढ होते. ६) रेडिएशनच्या संपर्कात येणे टाळावे, कारण रेडिएशन हे रक्तापर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे ब्लड कॅन्सरची शक्यता वाढू शकते. ७) केमिकल्सच्या संपर्कात येणे टाळावे, कारण घातक केमिकल्समुळे ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *