आठवडाभर बँका बंद, कामे त्वरित पूर्ण करा

केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलीनीकरण करून चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात बँक अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे. एक आठवडा बँक बंद राहणे अडचणीचे ठरणार आहे. बँका बंद राहणार असल्याने एटीएमवर ताण पडणार आहे.

केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलीनीकरण करून चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण होईल. सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँकेत विलीन होतील.

या निर्णयाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. या संपाला सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. संपूर्ण देशभरात संप पुकारण्यात आला असल्यामुळे त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

२६ (गुरुवार) आणि २६ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी संप पुकारला आहे. तर त्याच्या पुढच्या दिवशी चौथा शनिवार आणि रविवार असे रजेचे दिवस असल्याने बँका बंद राहतील. तर सोमवार आणि मंगळवार ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तसेच २ ऑगस्ट रोजी महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त बँकांना रजा असेल. त्यामुळे या काळात जवळपास आठवडाभर बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे २५ सप्टेंबरपूर्वी बँकेशी संबंधित कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

दरम्यान, कामाचा आठवडा सहाऐवजी पाच दिवसांचा करावा, या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी बँक कर्मचारी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनिश्चित कालासाठी संपावर जाण्याची शक्यता आहे. या संपात केवळ सरकारी बँकांतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. परंतु खासगी बँका सुरू राहणार आहेत.

बँकांचे विलीनीकरण होऊ नये, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी, आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावे, बँकांमध्ये नोकरभरती करावी, एनपीएस रद्द करावा, ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी, वेतन आणि पगारात बदल करावे, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. info@Khaasre.com या इमेल आयडीवर आपल्याकडील खासरे माहिती तुम्ही पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *