व्हायरल व्हिडीओ: आपल्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीला मोदी हुसकावतात तेव्हा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. मोदींचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी काही व्हिडीओ चांगले असतात तर कधी चुकीची माहिती देखील पसरवली जाते. पण यामध्ये नेहमीच एक गोष्ट सामान्य दिसून येते ती म्हणजे मोदींचे कॅमेरा प्रेम. अनेकदा मोदी कॅमेरा आणि त्यांच्यात येणाऱ्या व्यक्तीला बाजूला सरकावताना दिसतात.

मोदींचे कधी मार्क झुकरबर्गला तर कधी योगी आदित्यनाथ यांना बाजूला सरकावतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मोदी खरोखर कॅमेरासमोरून बाजूला करत असतात का दुसरं काही करत असतात हे त्यांनाच माहिती.

मोदी यांचा आज एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचा वाढदिवस ते आज साजरा करताय. गुजरातमधील केवडीया येथील खलवानी इको टूरिज्म ला ते फेरफटका मारताना आज दिसले. पण येथे फेरफटका मारतानाचा एक व्हिडीओ वायरल झाला. ज्यामध्ये मोदी हे आपल्या आणि कॅमेऱ्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीला बाजूला करत आहेत.

व्हिडीओमध्ये खरोखर मोदी हे त्या व्यक्तीला कॅमेऱ्यामुळे बाजूला करत आहेत का दुसऱ्या कारणामुळे हे स्पष्ट नसले तरी लोकांना त्यांची खिल्ली उडवण्याची संधी मिळाली.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *