खिचडीवाली ते करोडपती बबीताताई ताडे यांच्या विषयी काही खासरे माहिती

नशीब कधी बदलेल याचा कोणाला अंदाज नसतो असेच काही बबिताताई ताडे यांच्या सोबत झालेले आहे. कधी काळी फक्त १५०० रुपये मानधनावर खिचडी बनविणाऱ्या बबिताताई आज करोडपती झाल्या. नशीब म्हणण्यापेक्षा त्यांच्या बुद्धी मुळे हे घडले हे म्हणायला हरकत नाही.

कोण बनेगा करोडपती हा लोकप्रिय शो अमिताभ बच्चन होस्ट करतात आणि या कार्यक्रमाचे चाहते सर्व भारतात आहे परंतु या वेळेस करोडपती होण्याचा मान मिळाला आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील बबिता ताडे यांना, आणि त्यांच्या विषयी काही खासरे माहिती आपण बघणार आहोत.

बबिता ताडे अमरावती जिल्ह्यातील पंचफुलाबाई हरणे खिचडी शिजविण्याचे काम करतात याच विद्यालयात त्यांचे पती शिपाई आहे. बबिताताई यांचे शिक्षण पदवी पर्यंत पूर्ण झालेले आहे त्या नंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी एक वर्ष शिक्षण घेतले. परंतु पोटाची भूक मोठी असते त्यांनी कुटुंबाच्या जवाबदारी वाढल्यामुळे शिक्षण बंद केले.

या काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील केला आहे. नंतर त्यांनी कौटुंबिक जवाबदारीमुळे पूर्ण वेळ आपल्या कामाला दिला. केशव तायडे हे बबिताताईचे पती मुळचे अकोला जिल्हातील चोहोटा येथील आहे. परंतु नौकरीमुळे मागील २३ वर्षापासून ते अंजनगाव येथे स्थायिक झालेले आहे.

अंजनगाव येथे शिक्षक कॉलनी मध्ये स्थायिक असलेले ताडे कुटुंबाला दोन अपत्य आहेत. मुलगी पुणे येथे शिक्षण घेत आहे तर मुलगा दहाव्या वर्गात अंजनगाव येथे शिकत आहे. त्यांनी केलेल्या या असामान्य कामगिरीमुळे सगळीकडे त्यांची वाहवा सुरु आहे.

एमए ला प्रवेश घेतल्या नंतर बबिता ताईना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचे स्वप्न होते परंतु मुले लहान असल्याने त्या हे करू शकल्या नाही. या दरम्यान त्यांनी कोण बनेगा करोडपती मध्ये जाण्याचे ठरविले. सध्या अकरावा सीजन सुरु आहे. या साठी देशभरातून ३३ लाख स्पर्धक इच्छुक होते. त्यापैकी फक्त ४ हजार ८०० स्पर्धक पात्र ठरले.

ऑडीशनच्या शेवटी त्यापैकी फक्त १२० स्पर्धक हे शेवटच्या राउंड करिता पात्र ठरले होते. एवढा मोठा प्रवास करून बबिता ताई कोण बनेगा करोडपती मध्ये पोहचल्या. अमिताभ बच्चन यांच्या सोबत बोलल्या नंतर त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली अश्या ते सांगतात.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com वर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *