सोने घेताना फसवणुकी पासून वाचायचे असेल तर हा लेख नक्की वाचा

सोने खरेदी करण्यात भारत अव्वल आहे. उन्हाळ्यात लग्नसराई मुळे याचे प्रमाण वाढते आणि सध्या सोने खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे. नुकतीच एक फेसबुक वर पोस्ट वायरल झालेली आहे तीच माहिती आता आपण बघूया खासरेवर

सोन्यात होणारी फसवणूक

सोन्यात अंगठी बनवत असताना बनविल्यानंतर tunch काढून घ्या, लोक हे फायद्यासाठी KDM मध्ये दागिने तय्यार करुन देतात. त्यात सोन्याचे पैसे हे त्यात किती टक्के सोने आहे ( कॅरेट प्रमाणे 16/18/22/24 ) प्रमाणे घेत नाहीत. ते lumsum घेतात समजा उदाहरणार्थ .

तुम्ही मंगळसूत्र बनवायला दिले आहे 3( 30 ग्राम) तोळे चे आणि त्यादिवसाचा सोन्याचा भाव हा 31500/- असेल तर आपला प्रश्न सोनाराला हा असला पाहिजे की हा दागिना किती कॅरेट चा असेल ? आणि जसे 916 हॉलमार्क बनवायच्या असेल तर त्यात 91.60 % सोने असते इतर तांबे,चांदी, असते तर सोनाराने 31500 च्या 91.60% च सोन्याचा भाव लावला पाहिजे.

जेव्हा दागिने तयार होतील तेव्हा त्यांच्या net weight सोन्याचे आणि gross weight नक्की पाहिजे असे सांगा तसेच त्यांच्या कडून touch report नक्की घ्या 50/- रुपयात येतो.जेणे करून त्यात किती टक्के सोने आहे आणि किती कॅरेट सोने वापरले आहे ते कळेल, माझ्या कडे एक याजमान पुष्कराज , निलम करीत आले त्यांनी आपल्या जवळील मंगळसूत्र दिले ते त्यांना सोनाराने kadm मध्ये बनवुन दिले 6 वर्षांपासून ते वापरत होते.

बनविले त्यावेळेस 91% सोने वापरले आहे असे सांगितले आणि पैसे पण 91% घेतले सोन्याच्या भावा प्रमाणे परंतु मी tunch काढला त्यावेळेस ते फक्त 70 ते 75 टक्के सोने होते. ही खुप मोठी फसवणूक आहे म्हणजे आजच्या तारखेला 21 % सोन्याचे 3 तोळे चे ( 31500 × 21% × 3 तोळे – 19845 /- नुकसान) अश्यांप्रकारे हे प्रकार चालु आहेत.

सध्या हॉलमार्क पद्धत शहरात जरी असली तर बरेच सोनार हे जास्त मजुरी सांगून kdm मध्ये बनवण्याचा plan करीत लूट करीत आहेत . गावातील सध्या अशिक्षित लोक तर सर्वात जास्त बळी पडत आहेत. मुंबई पुणे सारख्या शहरात well educated लोक पण हा विचार नाही करत,हे दुर्दैव ।

स्वतः जागरुक व्हा.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *