कोण आहे ती आजी जिच्या व्यवसायात आनंद महिंद्रांना पैसे गुंतवायचे आहेत

आनंद महिंद्रा हे व्यवसाय जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ऍटोमोबाइल, बँकिंग आणि टेकनॉलॉजी विश्वातील महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड उद्योगसमूहाचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. देशातील प्रमुख दहा उद्योगपतींमध्ये त्यांची गणना केली जाते. आपल्या ट्वीटमुळे ते सतत चर्चेत असतात.

नुकतेच त्यांनी तामिळनाडूमधील एका वृद्ध महिलेची कहाणी ट्विटरवर शेअर केली आहे. इतकेच नव्हे तर त्या महिलेच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण…

आनंद महिंद्रांनी काय ट्विट केलं आहे ?

१० सप्टेंबरला आपल्या ट्विटर अकाउंटवरून एका वृद्ध महिलेची कहाणी शेअरकरताना आनंद महिंद्रा म्हणतात, “काही कहाण्या अगदीच सामान्य असतात, परंतु तुम्ही जर कमलाथल सारखे काहीतरी प्रभावशाली काम करता, तेव्हा निश्चितच ते जगाला हैराण केल्याशिवाय राहणार नाही.

मला वाटते की त्या आज देखील लाकडावर चालणाऱ्या चुलीचा वापर करतात. जर कुणी त्यांना ओळखत असेल, तर मला त्यांना एक LPG गॅस शेगडी द्यायची इच्छा आहे आणि त्यांच्या व्यवसायात मला गुंतवणूक करायला आनंदच होईल.”

कोण आहे ती वृद्ध महिला ?

तामिळनाडूच्या कोईमतूर शहरापासून २० किमी अंतरावर पेरूरच्या जवळ वादिवेलाम्पालायाम नावाचे एक गाव आहे. त्या गावात कमलाथल नावाच्या ८० वर्षांच्या वृद्ध महिला राहतात. सर्वजण त्यांना दादी म्हणून ओळखतात.

या कमलनाथ आजदेखील एक रुपयात सांबर आणि मसालेदार चटणी सोबत इडली विकतात. ३० वर्षांपासून त्या इडली विक्रीचा व्यवसाय करतात. कमलाथल कुठलाही नफा न पाहता केवळ भुकेल्या लोकांचे पोट भरण्यासाठी इतक्या कमी दराने इडली विकतात.

आनंद महिंद्रांना करायचीय कमलाथल यांच्या व्यवसायात गुंतवणूक

कमलाथल दादीच्या हातची इडली इतकी चविष्ट असते की दोन किमीवरुन लोक इडली खाण्यासाठी येतात. दादी दररोज जवळपास १००० इडल्या बनवतात. विशेष म्हणजे ८० वर्षांच्या कमलाथल सगळी कामे स्वतःच करतात. स्वतःच्या हातांनी बनवलेल्या इडल्या त्या १ रुपयाने विकतात, जेणेकरून मजूर लोक आणि त्यांचा परिवार ते खरेदी करू शकतील.

आजूबाजूच्या गावात तीच इडली ६ रुपयांना मिळते. या सगळ्या गोष्टी त्या चुलीवर बनवतात. आनंद महिंद्रांना दादीची ही गोष्ट खूप भावली आणि त्यांनी दादीला मदत म्हणून त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *