जगभरातील अवकाश शास्त्रज्ञ या अंधश्रद्धा पाळतात

शास्त्रज्ञ अंधश्रद्धाळू असणे कितपत शक्य आहे ? दिवसभर चतुर्थीचा उपवास पाळून शाळेत चंद्राच्या कला शिकवणारे भूगोलाचे शिक्षक आपल्याच देशात आहेत, इथपर्यंत ठीक आहे. असे म्हटले जाते की कोणत्याही लहान-मोठ्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी देवाची पूजा केली पाहिजे.

परंतु जेव्हा विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाचा डंका वाजवणारे इस्त्रोचे शास्त्रज्ञही असे करतात तेव्हा प्रश्न पडतो. केवळ इस्त्रोच नाही तर जगातील इतर देशांचे शास्त्रज्ञही वेगवेगळ्या अंधश्रद्धा पाळतात. जगभरातील वैज्ञानिकांच्या अंधश्रद्धेबद्दल जाणून घेऊया…

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची अंधश्रद्धा

१) इस्रोचे वैज्ञानिक प्रत्येक प्रक्षेपणापूर्वी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन रॉकेटची पूजा करतात आणि रॉकेटचे एक छोटे मॉडेल तिरुपतीला अर्पण करतात. २) इस्त्रोचे एक माजी निदेशक प्रत्येक रॉकेट प्रक्षेपणाच्या दिवशी नवीन शर्ट घालायचे. ३) इस्रोच्या सर्व मशीन आणि उपकरणांवर विभूती आणि कुंकापासून भगवान शंकराच्या कपाळावर असते तसे त्रिपुंड बनवले जाते.

४) मंगळयान मिशनच्या वेळी जेव्हा जेव्हा मंगळयान एका कक्षेतून दुसर्‍या कक्षेत नेले जायचे, तेव्हा तेव्हा मिशन संचालक एस.अरुणनन मिशन कंट्रोल सेंटरच्या बाहेर येत असत. त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपल्याला हे पाहण्याची इच्छा होत नाही, तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काहीही.

मंगळयान मिशनच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस्रोमध्ये गेलेहोते. जोपर्यंत प्रधानमंत्री इस्त्रोमध्ये असतील, तोपर्यंत कोणीही मिशन कंट्रोल सेंटरच्या बाहेर जाऊ शकणार नाही असा प्रोटोकोल होता. मात्र अरुणानन यांना आतबाहेर जाण्यायेण्याचा विशेष परवानगी मिळाली होती.

रशियन अवकाश वैज्ञानिकांच्या अंधश्रद्धा

१) रशियन अंतराळवीर यानात बसण्यापूर्वी जी बस त्यांना लाँचपॅड पर्यंत घेऊन जाते, त्या बसच्या बसच्या मागील बाजूच्या उजव्या चाकावर लघुशंका करतात. १२ एप्रिल १९६१ रोजी रशियाचा पहिला अंतराळवीर युरी गागरीन याला खूप जोराची लघुशंका आली होती. त्याने रस्त्यावर मध्येच बस थांबवून बसच्या मागील बाजूच्या उजव्या चाकावर लघुशंका केली. त्याची मोहीम यशस्वी पार पडली. तेव्हापासून रशियाचे सर्व अंतराळवीर ही युक्ती वापरतात.

२) अंतराळात जाण्यापूर्वी रशियान अंतराळवीरांसाठी संगीत वाजवले जाते. युरी गागारिन रॉकेटमध्ये बसल्यानंतर त्याने मिशन कंट्रोल सेंटरला संगीत वाजविण्यास सांगितले होते. तेव्हापासून आजपर्यंत सर्व अंतराळवीरांसाठी युरी गागरिनसाठी वाजवलेली तीच गाणी वाजवली जातात.

३) रशियन अंतराळवीर ज्या यानातून जाणार आहेत, त्या यानात बसल्याशिवाय त्याकडे बघत नाहीत. त्यांचे प्रशिक्षण एक नक्कल रॉकेटद्वारे करण्यात येते. ४) युरी गगारिनने अंतराळात जाण्यापूर्वी त्याच्या कार्यालयातील गेस्ट बुकवर सही केली होती. तेव्हापासून याला लकी गोष्ट मानून सर्व अंतराळवीर गागरिनच्या गेस्ट बुकमध्ये सही करूनच प्रवासाला निघतात.

५) रशियातील बायकोनूर कॉस्मोड्रोम हा जगातील पहिला आणि सर्वात मोठा लाँचपॅड आहे. मागच्या ५० वर्षांपासून प्रत्येक यशस्वी प्रक्षेपणानंतर येथे एक वनस्पती लावली जाते. त्याला अव्हेन्यू ऑफ हिरोज म्हणतात.

६) आकाशात प्रवासादरम्यान कुठलाही अपघात होऊ नये म्हणून रशियन कॉसमोनॉट कूलिंग पाईपवर एखाद्या महिलेचे नाव लिहले जाते. असे सांगितले जाते की एकदा असे नाव लिहले नव्हते, त्यावेळेस अपघातात ४७ लोक मरण पावले होते.

७) २४ ऑक्टोबर 1960 आणि 1963 रोजी बायकोनूरमध्ये लॉन्च करण्यापूर्वी दोन मोठे अपघात झाले होते. या अपघातात शेकडो लोकांनी आपला जीव गमावला होता. तेव्हापासून रशियाकडून २४ ऑक्टोबर यादिवशी कुठलेही प्रक्षेपण केले जात नाही.

अमेरिकन शास्त्रज्ञांच्या अंधश्रद्धा

१) अमेरिकेची अंतराळ संस्था नासा जेव्हा प्रक्षेपण करते, तेव्हा जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमध्ये बसून वैज्ञानिक शेंगदाणे खातात. १९६० च्या दशकात रेंजर मिशन ६ वेळा अयशस्वी झाले होते. असे सांगितले जाते की सातव्या प्रयत्नात ते ज्यावेळेस यशस्वी झाले त्यावेळेस वैज्ञानिक लॅबोरेटरीमध्ये बसून शेंगदाणे खात होते. तेव्हापासून प्रक्षेपणाच्या वेळी शेंगदाणे खाण्याची प्रथा सुरू झाली.

२) प्रक्षेपणापूर्वी नाश्त्यासाठी फक्त अंडा भुर्जी आणि मांसच मिळते. ही प्रथा पहिल्या अमेरिकन अंतराळवीर अ‍ॅलन शेफर्ड आणि जॉन ग्लेन यांच्या काळापासून आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *