आयफोन ११, प्रो आणि प्रो मॅक्स २७ सप्टेंबरपासून भारतात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Apple ने १० सप्टेंबरच्या रात्री आपले तीन नवीन आयफोन लाँच केले आहेत. आयफोन ११, आयफोन प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स अशी त्यांची नावे आहेत. Apple ने प्रथमच ट्रिपल रियर कॅमेरा असणारा आयफोन लाँच केला आहे.

भारतीय बाजारात २७ सप्टेंबरपासून हे फोन विक्रीसाठी उपलब्ध असतील. आयफोन ११ मालिकेतील फोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली कॅमेरा देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. पाहूया तिन्ही फोनबद्दल सर्व माहिती…

१) आयफोन ११

६.१ इंच एलसीडी आयपीएस डिस्प्ले (१७९२ x ८२८ पिक्सल), iOS १३ ऑपरेटिंग सिस्टीम (अद्ययावत), ए १३ बायोनिक चिप थर्ड जनरेशन प्रोसेसर, १२ + १२ मेगापिक्सेल रियर कॅमेरा, १२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ड्युअल सिम (नॅनो सिम आणि ई-सिम), ६४ जीबी, १२५ जीबी, २५६ जीबी स्टोरेज क्षमता (६४ जीबी – ६४९०० रुपये, १२५ जीबी – ६९९०० रुपये, २५६ जीबी – ७९९०० रुपये)

२) आयफोन ११ प्रो

५.८ इंच ओएलईडी सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले (2436×1125 पिक्सेल), iOS १३ ऑपरेटिंग सिस्टीम (अद्ययावत), ए १३ बायोनिक चिप थर्ड जनरेशन प्रोसेसर, १२ + १२ मेगापिक्सेल रियर कॅमेरा, १२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ड्युअल सिम (नॅनो सिम आणि ई-सिम), ६४ जीबी, १२५ जीबी, २५६ जीबी स्टोरेज क्षमता (६४ जीबी – ९९९०० रुपये, १२५ जीबी – १,१३,९०० रुपये, २५६ जीबी – १,३१,९०० रुपये)

३) आयफोन ११ प्रो मॅक्स

६.५ इंच ओएलईडी सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले (2436×1125 पिक्सेल), iOS १३ ऑपरेटिंग सिस्टीम (अद्ययावत), ए १३ बायोनिक चिप थर्ड जनरेशन प्रोसेसर, १२ + १२ मेगापिक्सेल रियर कॅमेरा, १२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ड्युअल सिम (नॅनो सिम आणि ई-सिम), ६४ जीबी, १२५ जीबी, २५६ जीबी स्टोरेज क्षमता (६४ जीबी – १,०९,९०० रुपये, १२५ जीबी – १,२३,९०० रुपये, २५६ जीबी – १,४१,९०० रुपये)

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *