‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी हि लवंगी आहे तरी कोण?

छोट्या पडद्यावरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका महाराष्ट्रात घराघरात पोहचलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित या मालिकेचा महाराष्ट्रात प्रचंड प्रेक्षकवर्ग आहे. छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. संभाजी राजेंचा पूर्ण इतिहास लोकांना माहिती नव्हता. या मालिकेतून तो चांगल्याप्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

छत्रपती संभाजी राजेंच्या आयुष्यात लहानपणापासूनच अनेक चढ-उतार आले. वयाच्या दुस-या वर्षी आईचं छत्र हरवलं मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचं बाळकडू त्यांना मिळालं. शंभूराजेंचं पूर्ण चरित्रच या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.

मालिकेत राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणा-या प्रतीक्षा लोणकर, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे , औरंगजेबाची भूमिका साकारणारे अमित बहल, शंभूराजेंची भूमिका साकारणारे डॉ अमोल कोल्हे यांनी खूप चांगले काम केले आहे.

या मालिकेत सध्या मराठ्यांच्या मुरुड जंजीरा या मोहिमेवर कथानक सुरु आहे. या कथानकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या लवंगी या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. हि लवंगी कोण आहे जाणून घेऊया..

हि लवंगी आहे तरी कोण?

मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावल्या आहेत. नव्याने आलेल्या लवंगीने देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. लवंगी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री स्वरांगी मराठे हिने साकारली आहे.

जंजिरा किल्ल्याचा सुभेदार सिद्धी जौहर याच्या दासीच्या रुपात झळकलेल्या लवंगीने आपल्या सौंदर्याची भुरळ प्रेक्षकांवर पाडली आहे. स्वरांगी हि प्रसिद्ध शात्रीय संगीत गायक पंडीत राम मराठे यांची नात आहे. १४ फेब्रुवारी १९९२ रोजी जन्मलेल्या स्वरांगीचे शिक्षण ठाणे येथील सरस्वती विद्यालय हायस्कूलमधून झालेले आहे.

स्वरांगीने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. तिने मिशन कश्मीर व बाजीराव मस्तानी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या चित्रपटात तिने मस्तानीची मैत्रीण झुमरी ही व्यक्तिरेखा साकारली होती.

अभेद्य किल्ला म्हणून नावलौकिक असलेला मुरुड जंजिरा किल्ल्यावर भगवा फडकवण्याची जबाबदारी पराक्रमी सरदार कोंडाजी फर्जंद यांच्यावर सोपवली होती. सिद्धी जौहरने कोंडाजी यांना लवंगी भेट दिली होती. या लवंगीवर कोंडाजी फर्जंद यांचे प्रेम होते व तिच्यामुळेच मराठ्यांची जंजीरा मोहिम फसली, अशा काही आख्यायिका इतिहासात आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *