ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, सेवन करण्याने होतात सर्व आजार दूर

आपल्या रोजच्या जेवणात आपण आपल्याकडे बाजारात मिळणाऱ्या भाज्याच खातो. वांगे, बटाटे, टोमॅटो, घेवडा, पावटा, कोबी, फ्लॉवर आणि पालेभाजा याच्या पलीकडे आपण जात नाही.

पण समजा तुम्हाला विचारले “जगातील सर्वात शक्तिशाली भाज्यांमध्ये यापैकी कोणती आहे का ?” तर तुम्हाला खात्रीने काहीच सांगता येणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा भाजीबद्दल सांगणार आहोत, जी भाजी जगात सर्वात शक्तिशाली म्हणून ओळखले जाते. कारण या भाजीत असेच काही खास औषधी गुणधर्म आहेत.

कोणती आहे ती शक्तिशाली भाजी ?

करटोली असे त्या जगातील सर्वात शक्तिशाली भाजीचे नाव आहे. या भाजीचे सेवन करण्याने आपल्याला ताकत तर मिळतेच, पण सोबत आपले शरीरही पोलादासारखे मजबूत होते. या भाजीला करटोली किंवा गोड कारले असेही म्हणतात.

करटोली ही भारतातील डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून तिला कारल्यासारखी दिसणारी छोटी फळे येतात. या फळाची भाजी करुन खाल्ल्यास माणूस निरोगी होतो.

असे काय खास असते या भाजीत ?

करटोलीच्या भाजीत मांसापेक्षा ५० पट अधिक शक्ती आणि प्रथिने असतात. करटोलीमध्ये असणारी फायटोकेमिकल्स आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतात. पावसाळ्याच्या काळात करटोलीची फळे बाजारात विक्रीसाठी येतात. करटोलीच्या उपयुक्ततेमुळे तिला जगभरात मागणी आहे.

हे आहेत या भाजीचे फायदे

१) करटोलीमध्ये असणारे मोमोरेडीसिन घटक एन्टीऑक्सिडेंट, अँटीडायबिटीज आणि अँटिस्टे्रस म्हणून कार्य करतात. त्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. २) करटोलीची भाजी अनेक रोगांवर गुणकारी आहे. करटोलीचे लोणचे पचन सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावते.

३) करटोली खाणे कर्करोगासाठी फायदेशीर असते. त्यात असणारे केरोटोनोइडस डोळ्यांचे विविध रोग, हृदयरोग आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांना प्रतिबंध करतात.

४) सर्दी आणि खोकल्यामध्येही करटोलीची भाजी फायदेशीर आहे. सर्दी खोकल्यापासून आराम मिळविण्यासाठी करटोलीत असणारे अँटी-एलर्जेन आणि ऍनाल्जेसिक उपयुक्त आहेत. ५) वजन कमी करण्यासाठीही करटोली फायदेशीर आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *