‘या’ भागात आहेत देशातील सर्वात महागडी घरं! १ स्क्वेअर फूटची किंमत ऐकून व्हाल थक्क

शहरांमध्ये मिळणाऱ्या सुखसुविधा आणि राहणीमानाच्या उच्च दर्जाचे आकर्षण सर्वांनाच असते. चांगल्या पगाराची नोकरी किंवा चांगली कमाई देणारा व्यवसाय असल्यास शहरात आपला स्वतःचा एखादा तरी फ्लॅट असावा असं कुणाला नाही वाटणार ? आता शहरातील घरांचे दर गावाकडच्या घरांच्या दरापेक्षा कित्येक पटीने जास्त असतात हे नवीन सांगायला नको.

शहरात तर सगळे पैसेवालेच असतात, त्यामुळे घरांसाठी स्पर्धा आहे. निवासी क्षेत्र चांगले असेल तर मग तिथल्या घरांच्या किमती आकाशाला भिडणाऱ्याच असतात. एनरॉक नावाच्या प्रॉपर्टी अ‍ॅडव्हायझरी कंपनीने देशातील अशाच सर्वात महाग निवासी क्षेत्रांची यादी जाहीर केली आहे. चला तर पाहूया किती आहेत त्या भागातल्या घरांचे दर…

महाराष्ट्र्रात सर्वाधिक महाग घरे

एनरॉकने जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्राच्या दक्षिण मुंबईमधील ताडदेव हे देशातील सर्वात महाग निवासी क्षेत्र आहे. येथे उपलब्ध असणाऱ्या घरांची किंमत सरासरी ५६००० रुपये पर स्क्वेअर फूट इतकी मोठी आहे. मुंबईतील सर्वात जुन्या भागांपैकी हा एक भाग आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई महानगर प्रदेशातील वरळी आणि महालक्ष्मी हे निवासी क्षेत्र असून त्या भागात घरांचे दर अनुक्रमे पर स्क्वेअर फूट सरासरी ४१५०० आणि ४०००० रुपये आहेत.

तामिळनाडू मध्येही आहेत महाग घरे

महाग निवासी क्षेत्रांच्या यादीत महाराष्ट्रानंतर तामिळनाडूतील राज्यातील चेन्नई शहराचा नंबर लागतो. महाग निवासी क्षेत्रांच्या यादीत चेन्नईच्या नुंगमबक्कम क्षेत्राचा चौथा क्रमांक लागतो. इथे घरांचे दर सरासरी १८००० रुपये पर स्क्वेअर फूट आहेत.

त्यांनतर पाचव्या क्रमांकावर चेन्नई मधीलच एग्मोर क्षेत्र तर सातव्या क्रमांकावर अण्णानगर हे क्षेत्र आहे. तिथल्या घरांचे दर सरासरी अनुक्रमे १५१०० रुपये आणि १३००० रुपये पर स्क्वेअर फूट इतके आहेत.

भारतातील इतर महाग निवासी प्रदेश

एनरॉकच्या यादीत पुण्यातील कोरेगाव पार्क भाग आठव्या स्थानावर असून इथे सरासरी १२५०० रुपये पर स्क्वेअर फूट दराने घरे मिळतात. दिल्लीतील करोलबाग निवासी क्षेत्र सहाव्या स्थानी असून इथे घरांचा दर सरासरी १३५०० रुपये प्रति चौरस फूट आहे.

दहाव्या स्थानी असणाऱ्या कोलकाताच्या अलीपूर भागात घरांचे दर सरासरी ११८०० रुपये पर स्क्वेअर फूट आहेत. मर्यादित जागा आणि निवासी क्षेत्रातील दळणवळण सेवा, हॉटेल्स, रेस्टोरंटस, शिक्षण आणि आरोग्य सेवा असे अनेक घटक घरांच्या किमतीवर प्रभाव टाकतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *