जबरदस्त गाणं गाणारा तो तरुण रानू मंडल यांचा मुलगा तर नाही ना? बघा व्हिडीओ..

सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार झाल्याचं आपण बघितलं आहे. नुकतंच कोलकात्यातील रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या राणू मंडलचं ताजं उदाहरण आपल्या समोर आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांचंही आयुष्य सोशल मीडियामुळेच बदललं.

त्यांच्या एका व्हिडीओमुळे त्या भारतात घरोघरी पोहचल्या. त्यांना सिनेमात गाणं गाण्याची देखील संधी मिळाली. त्यांचे अनेक व्हिडीओ त्यानंतर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण सध्या एक दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण गाणं गात आहे.

या तरुणाने कुमार सानू यांच्या आवाजातील ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है..’ हे गाणं एकदम सुरेल आवाजात गायलं आहे. राणूचा आवाज ज्याप्रकारे लता मंगेशकर यांची कॉपी होता त्याच पद्धतीने या तरुणाचा आवाज देखील कुमार सानूची कॉपी आहे.

या तरुणाचे गाणे वायरल झाल्यानंतर नेटकऱ्यानी त्याला राणू मंडलचा मुलगा ठरवून टाकले आहे. नेटकरी या तरुणाला रानू मंडल यांचा मुलगा म्हणत असले तरी याबाबत अद्याप काही मिळू शकलेली नाही. या व्हिडीओला फेसबुकवर दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *