भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या या खेळाडूंचेही अभिनंदन करायला हवे

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत जिंकलेली पीव्ही सिंधू सातत्याने चर्चेत आहे. या स्पर्धेत सिंधूने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी तिचा दोनदा पराभव झाला होता, मात्र यावेळी तिने अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला आणि भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

भारतात परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीही सिंधूची भेट घेतली आणि ट्विटरवर लिहिले, “देशाचा अभिमान आणि चॅम्पियन, जी देशासाठी सुवर्णपदक घेऊन आली आणि आणि भरपूर आदरही. पीव्ही सिंधूची भेट घेतली आणि तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.”

पीव्ही सिंधूने सुवर्ण जिंकले त्याचवळी देशातील अपंग खेळाडूंनीही बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये १२ पदके जिंकून देशवासियांना आनंद साजरा करण्याची संधी दिली आहे.

पी.व्ही.सिंधूचे अभिनंदन करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या ट्विटला उत्तर देताना बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या सुकांत कदम याने लिहिले आहे की, “नरेंद्र मोदी जी, आम्ही सर्व १२ पॅरा-मेडललिस्ट ज्यांनी पदके जिंकली आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. तुमचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. तुम्हाला विनंती करतो की आम्हाला भेटण्याची परवानगी द्यावी. आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान आम्हाला तुम्हाला भेटायची संधी मिळू शकली नव्हती.”

नरेंद्र मोदींनी यापूर्वी पॅरा बॅडमिंटन टीमबद्दल बोलताना सांगितले होते, “१३० कोटी कोटी भारतीयांना पॅरा बॅडमिंटन संघाचा खूप अभिमान आहे. या संघाने बीडब्ल्यूएफ पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०१९ मध्ये १२ पदके जिंकली.

संपूर्ण संघाचे खूप सारे अभिनंदन. त्यांचे यश खूप आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक खेळाडू असामान्य आहे.” क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चैम्पियनशिपमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना १.८२ कोटी रुपयांचे बक्षीस दिले होते.

सुवर्ण पदक जिंकलेल्या खेळाडूंना २० लाख, रौप्य पदक जिंकलेल्या खेळाडूंना १४ लाख आणि कांस्यपदक जिंकलेल्या खेळाडूंना ८ लाख रुपये देण्यात आले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *