स्वतःच्या गाड्यांवर जाती, धर्म किंवा व्यवसायासंबंधी स्टिकर लावल्यास होणार कारवाई

लोकं मोठ्या हौसेने गाड्या घेतात. गाड्यांना चांगले नंबर मिळवण्यासाठी जास्तीचे पैसेही खर्च करतात. गाड्यांमध्ये आपल्या आवडीचे इंटेरियर करून घेतात. आवडीचे कुशन्स लावतात.

पण तुम्ही जर तुमच्या गाड्यांवर स्वतःच्या आवडीचे स्टिकर्स लावणार असाल तर आता तुम्हाला वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जाऊन दंड भरावा लागेल असा निर्णय नुकताच राजस्थान राज्यात घेण्यात आला आहे. हा अजब निर्णय घेण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया…

काय आहे नेमका निर्णय ?

राजस्थानमध्ये जे वाहनचालक आपल्या वाहनांवर जाती, धर्म किंवा व्यवसायाचा निर्देश असणारे स्टिकर्स लावून वाहन चालवताना सापडतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राजस्थानच्या वाहतूक विभागाने घेतला आहे. स्वतःच्या वाहनावर जाट, ब्राह्मण, राजपूत, हिंदू, मुस्लिम, वकील, किंवा डॉक्टर असं काहीही लिहले तर दंड भरावा लागणार आहे.

परंतु यासाठी किती रुपयांच्या दंडाची तरतूद असेल ते आदेशात देण्यात आले नाही. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १७७ नुसार जर या अपराधासाठी कुठल्याही दंडाची तरतूद नसेल तर पहिल्या वेळी जास्तीत जास्त १०० आणि नंतरच्या जास्तीत जास्त ३०० रुपयांपर्यंत दंड आकारता येते.

या पत्रामुळे घेतला हा निर्णय

राजस्थानमधील सिव्हिल राईट्स सोसायटी नावाच्या संस्थेने वाहतूक विभागाला पात्र लिहून सांगितले होते की “वाहनांवर जाती, धर्म, पदाचे, पक्षाचे किंवा गावाचे नाव लिहण्याची प्रथा वाढत आहे. या गोष्टीमुळे समाजात जाती आणि धर्मवादाला बळ मिळत आहे.

वाहनांवर विशेषतः खिडक्यांच्या काचांवर घोषणा किंवा स्टिकर लावल्याने ड्रॉयव्हरचे लक्ष विचलित करू शकतात आणि अपघात होऊ शकतात.” तसेच या पत्राचा संदर्भ लक्षात घेऊन वाहतूक विभागाने हे आदेश काढले आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *