शस्त्र परवाना कसा काढला जातो ?

भारतात आर्म्स ऍक्ट १९५९ अन्वये भारतीय नागरिकाला स्वतःच्या संरक्षणासाठी केवळ विनाप्रतीबंधित शस्त्रे (NPB) वापरण्याचेच लायसन मिळू शकते. विनाप्रतिबंधित शस्त्रे (NPB) देण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि गृह विभागाकडे असतात, तर प्रतिबंधित शस्त्रे (PB) देण्याचे अधिकार केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असतात. भारतात आठ इंचापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे, तशी शस्त्रे बेकायदा मानली जातात. तसेच भारतात केवळ देशी बनावटीचीच शस्त्रे वापरता येतात.

शस्त्र परवान्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?

शस्त्र परवान्यासाठी आपल्याला आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आपले पासपोर्ट साईज फोटो, आपले मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न याची पूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच आपण कोणती गन घेणार आहोत त्याचीही माहिती द्यावी लागते.

याशिवाय आपल्या भागातील दोन चांगल्या व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छिता त्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पटवून द्यावे लागते.

केवळ ही शस्त्रे वापरण्याची मिळते परवानगी

भारत सरकारच्या नियमांनुसार आपल्या देशात केवळ तीन प्रकारच्या शस्त्रांसाठी आपण अर्ज करु शकता. म्हणजेच भारतात तीन प्रकारची शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना मिळतो. भारतात शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या गन्सला परवाना मिळतो. एक भारतीय व्यक्ती वरीलपैकी कुठल्याही जास्तीत जास्त तिचं गन भारतात वापरु शकतो.

कसा निघतो शस्त्र परवाना ?

१) फॉर्म A – शस्त्र परवाण्यासाठी फॉर्म A भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परवाना कार्यालयात सादर करावा. २) आवश्यक तपासणी – शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का ते तपासले जाते.

पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अर्जदाराची मुलाखतही घेतली जाते. मुलाखतीत अर्जदाराला बंदूक का ठेवायची आहे असा प्रश्न विचारला जातो. बहुतेक अर्जदार स्वसंरक्षणाचे कारण सांगतात.

३) मुलाखती नंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवला जातो. जर या दोन्ही ठिकाणाहून कोणताही आक्षेप आला नाही आणि पोलिस अधिकारी देखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.

४) फी – पिस्तुल, रिव्हॉल्व्हर्स आणि रिपीट रायफल्सचे परवाना शुल्क १०० रुपये असून त्यांचे नूतनीकरण शुल्क ५० रुपये आहे. २२ बोअर रायफल परवान्यासाठी फी ४० रुपये आणि नूतनीकरण फी २० रुपये आहे. एमएल गन, एअर गनचे शुल्क १० रुपये आणि नूतनीकरण शुल्क ५ रुपये आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *