महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आहेत तरी कोण?

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. ३० ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्यानंतर महाराष्ट्राचे भावी राज्यपाल कोण होणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती.

सुमित्रा महाजन यांचेही नाव चर्चेत होते. परंतु सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत थेट राष्ट्रपती भवनाकडून भगतसिंग कोश्यारी यांचे नाव महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

कोण आहेत भगतसिंग कोश्यारी ?

भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंड राज्यातील भारतीय जनता पक्षातील एक ज्येष्ठ नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे ते कट्टर समर्थक आहेत. त्यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील नामती चेताडबड गावात झाला.

त्यांनी आग्रा विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. राजा इंटर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले तसेच पर्वत पियुष नावाच्या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले. त्यांनी “उत्तरांचल प्रदेश क्यूँ” ? आणि “उत्तरांचल संघर्ष एवं समाधान” नावाची दोन पुस्तकेही लिहली आहेत.

भगतसिंग कोश्यारी यांची राजकीय कारकीर्द

भगतसिंग कोश्यारी यांनी आणीबाणीदरम्यान दोन वर्ष तुरुंगवास भोगला आहे. ते उत्तराखंड राज्याचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते. २००१-२००२ दरम्यान त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. २००२ ते २००७ दरम्यान उत्तराखंड विधानसभेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे.

ते उत्तराखंड राज्य निर्माण होण्यापूर्वी उत्तरप्रदेश विधानपरिषद सदस्यही होते. कोश्यारी यांनी २००८-२०१४ दरम्यानन राज्यसभा सदस्य आणि २०१४-२०१९ दरम्यान लोकसभा सदस्य म्हणून संसदेत काम केले आहे. त्यासोबतच ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते.

राज्यपालाची कामे काय असतात ?

भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक परंतु नामधारी प्रमुख असतो. राज्याचा कारभार घटनेनुसार चालत नसेल तर राज्यपाल मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करू शकतात. कुठल्याही राज्याचा संकटकालीन परिस्थिती खर्च करावयाचा निधी राज्यपालांच्या हातात असतो. भारतचे राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात.

राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणुन राज्यपाल घटकराज्याच्या काम पाहतो. राज्यविधिमंडळाचे अधिवेशन भरवणे, शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणूक करणे, अध्यादेश काढणे, विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाला मान्यता देणे, इत्यादि कामे राज्यपाल करतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *