राणु मोंडलला घर तर मिळाले, पण सलमानने नाही “या” व्यक्तीने दिले

पश्चिम बंगालची राणु मोंडल ही सध्याची सोशल मीडिया क्वीन आहे असं म्हणलं तरी काय वावगे ठरणार नाही. राणाघाट रेल्वे स्टेशनवर “एक प्यार का नगमा है” गाण्याने सुरु झालेला तिचा प्रवास हिमेश रेशमियाच्या स्टुडिओपर्यंत जाऊन पोहोचला.

त्यानंतर तिला अजून एका गाण्याची ऑफर मिळाली आहे. यादरम्यान सलमान खानने राणुला एक ५५ लाखाचे घर गिफ्ट दिल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली, पण नंतर समजले की ती अफवा होती. वास्तवात राणु मोंडलसाठी सलमान खान नाही, तर दुसरी एक व्यक्ती घर देणार आहे.

राणु मोंडलचा “तो” व्हिडीओ कुणी बनवला ?

राणाघाट रेल्वे स्टेशनवरच्या त्या एका व्हिडीओने राणु मोंडलला आज एवढे ग्लॅमर मिळाले. हा व्हिडीओ अतीन्द्र चक्रवर्ती नावाच्या एका व्यक्तीने शूट केला होता. त्या व्हिडिओमध्ये राणु “एक प्यार का नगमा है” हे गाणे गात आहे.

एवढ्या गरिबीत जगणाऱ्या महिलेचा आवाज किती सुंदर आहे, तिच्या आवाजाला न्याय भेटला पाहिजे अशी त्यामागची भावना होती.आणि खरोखर तसं झालंही ! राणुला बॉलिवूडच्या एका चित्रपटातील गाण्याला आपला आवाज देता आला.

राणुला घर देणारी व्यक्ती कोण ?

हिमेश रेशमियाने राणुला स्टुडिओमध्ये आपल्या चित्रपटातील गाणे गाण्याची संधी दिल्यानंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली. त्यात दबंग सलमान खानने “Being Human” माणुसकी दाखवत राणूला चक्क ५५ लाख रुपयांचा बांगला दिल्याची बातमी आली.

परंतु शहनिशा केल्यावर समजले की ती एक अफवा होती. पण राणूला तिच्या हक्काचे घर मिळणार आहे. ज्या व्यक्तीने राणाघाट रेल्वे स्टेशनवर राणुचा तो व्हिडीओ शूट केला होता, तो अतीन्द्र चक्रवर्तीच राणुसाठी घर बनवत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *