बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असणारा जळगाव घरकुल घोटाळा काय आहे?

बऱ्याच वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत घोटाळ्यात अडकलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना ७ वर्ष कारावास आणि १०० कोटी रुपये दंड तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना ५ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

यांच्यासोबत ४८ लोकांना या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील माफीच्या साक्षीदार असणाऱ्या सिंधू कोल्हे यांची निर्दोष सुटका केली आहे. पाहूया नेमका काय आहे हा घोटाळा…

काय होता हा घोटाळा ?

जळगाव नगरपालिकेने “घरकुल योजना” नावाने एक योजना राबविली होती. झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात चांगले घर देणे असे त्या योजनेचे स्वरुप होते झोपडपट्टी निर्मूलन असा या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्याप्रमाणे ११० कोटींचे कर्ज काढून जळगाव नागरपालिकेने झोपडपट्टी भागात ११००० घरकुल बांधकामास १९९९ मध्ये सुरुवात केली.

मात्र कामास सुरुवात झाल्यापासून त्यामध्ये कायद्यांचे उल्लंघन, गैरव्यवहार, मनमानी कारभार असे प्रकार घडायला लागले. खुद्द ज्या जागेवर घरकूल बांधली जात होती ती जागा पालिकेकडे नव्हती, तसेच त्या बांधकामासाठी बिगरशेती प्रमाणपत्र घेण्यात आले नव्हते. मर्जीतले ठेकेदार निवडले गेले. ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने अगोदरच २९ कोटी रुपयांची बिनव्याजी रक्कम दिली गेली.

घोटाळा उघडकीस आला

२००१ मध्येच या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आले होते. ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केले नाही. त्याबद्दलही ठेकेदारावर २००८ पर्यंत काहीही कारवाई झाली नाही. कालांतराने नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत झाले.

त्यावेळचे महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी याप्रकरणी ३ फेब्रुवारी २००६ ला जळगाव शहर पोलीसांकडे घरकुल योजनेमध्ये २९ कोटी ५९ लाखांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल केली. २००८ मध्ये याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना पाच वर्षांसाठी अटक झाली होती. याप्रकरणात न्यायालयाने संबंधितांना दोषी ठरवत नवीन निकाल दिला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *