सनी देओलच्या मुलाला लहानपणी जे झेलावे लागले, ते कुणाच्याच बाबतीत होऊ नये

बॉलिवूड स्टार सनी देओलला २८ वर्षांचा एक मुलगा आहे, करण देओल त्याचं नाव ! करण लवकरच आपल्या वडिल आणि काकांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे.

“पल पल दिल के पास” नावाचा त्याचा पहिला चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पण करण देओल सध्या चर्चेत आहे तो त्याच्या चित्रपटाविषयी नाही, तर त्याच्या शाळेत घडलेल्या एका प्रसंगाच्या बाबतीत !

करण देओलने आपला लहानपणीच एक अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की कशा प्रकारे त्याला शाळेत सनी देओलचा मुलगा असल्याने लोक त्रास द्यायचे. “ह्यूमन्स ऑफ बॉम्बे” यांनी करणची एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.

पहिलीत असताना खावा लागला मार
आपल्या लहानपणीच्या प्रसंगाबाबत करण सांगतो, “मी ज्यावेळी पहिल्या वर्गात होतो तेव्हाची ही आठवण आहे. खेळांच्या स्पर्धा सुरु होत्या, मी शर्यतीत भाग घेतला होता.

मी तिथे उभा असताना काही मोठी मुलं तिथं आली. त्यांनी मला घेरले. त्यातल्या एकाने मला उचलले आणि सर्वांसमोर मला मारहाण केली. नंतर मला विचारले, “तू नक्की सनी देओलचा मुलगा आहेस का ? तू तर परत उठून लढत पण नाहीस.” मला खूप लाज वाटली.

शिक्षकांनी लायकी काढली
तिथून माझा मार्ग आणखी कठीण झाला. बहुतेक मुले माझी चेष्टा करतात आणि एवढंच नाही तर शिक्षकही असेच होते. एकदा मी गृहपाठ व्यवस्थित केला नव्हता, तेव्हा वर्ग सुरु असताना एक शिक्षक माझ्याकडे आले आणि म्हणाले, “तू फक्त बापाचे चेक लिहायच्या कामाचा आहेस, बाकी काही करण्याच्या लायकीचा नाहीस.”

या सगळ्यात फक्त माझ्या आईचाच मला आधार होता. ती मला सांगायची, “ती लोकं अशीच बोलतात कारण ती वास्तवात तशीच आहेत. ती तुझ्याबद्दल काहीही बोलत नाहीत.” आईची ही गोष्ट मला प्रोत्साहन द्यायची. अवघड होतं, पण मला माझ्यासाठी उभं राहायचं होतं.

मला हार मानण्याऐवजी उत्तर द्यायचे होते. मला हे समजून घ्यायचे होते की माझी किंमत काय आहे हे माझ्याशिवाय इतर कोणीही ठरवू शकत नाही.

स्वतःला उभं केलं
स्कुल टॅलेंट कॉम्पीटिशन हा माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी त्यात भाग घेण्याचा निर्णय घेतला. रात्रंदिवस मेहनत करून रॅप तयार केला. ज्यादिवशी स्टेजवर गेलो तेव्हा समोरचा लोकांचा जनसागर पहिला. एक दीर्घ श्वास घेतला. मनापासून सादरीकरण केले.

इतकी वर्ष सनी देओलच्या मुलगा म्हणून मला त्रास देणारी लोकं आज मला प्रोत्साहन देत होती. मला स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं, बेड्या तोडून मी स्वतंत्र झालो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *