दोन्ही गर्लफ्रेंडला हुंडा देऊन त्याने केले दोघींसोबत लग्न, ऐसा भी होता है भाई !

एकाच वेळी दोन दोन व्यक्तींवर प्रेम करणारी लोकं आपण पाहिली असतील. कदाचित ती लोकं एकापाठोपाठ त्या दोन्ही व्यक्तींना भेटत असतील, त्यांच्यासोबत डेटिंगही करत असतील.

परंतु ज्यावेळी निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा त्या लोकांना दोन्ही पैकी कुठल्याही एका व्यक्तीचीच निवड करावी लागते आणि दुसऱ्या व्यक्तीसोबतचा चॅप्टर क्लोज करावा लागतो. सरते शेवटी कुठल्या तरी एकाचे हृदय तुटणे निश्चित आहे. अशा लोकांच्या प्रेमकहाणीचा हाच .शेवट असतो. पण इकडे जरा वेगळं घडलंय…

इंडोनेशियन व्यक्तीने केले दोन्ही मैत्रिणींसोबत लग्न

इंडोनेशियामध्ये एकापेक्षा जास्त लग्न करणे कायद्याने गुन्हा नाही. जर पहिली पत्नी दुसरे लग्न करण्यास परवानगी देत असेल तर इंडोनेशियन व्यक्ती एकापेक्षा जास्त लग्न करू शकतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, इंडोनेशियाच्या कालीमंटन जिल्हातील ऐरतारप गावातील एका वराने एकाच वेळी दोन वधुंशी विवाह केल्याने इंडोनेशियात सोशल मीडियात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

याबद्दल बोलताना त्या वराने स्थानिक माध्यमांना सांगितले की, “त्या दोघींचे हृदय मला दुखवणे माझ्या मनाला पटले नाही. म्हणूनच मी त्या दोघींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

दोन्ही गर्लफ्रेंडला हुंडा देऊन त्याने केले दोघींसोबत लग्न

भारताप्रमाणेच इंडोनेशियात अनेक परंपरा पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे हुंडा ! पण त्यांच्याकडे वधूच्या कुटुंबीयांनी वराच्या कुटुंबियांना पैसे द्यायचे नसतात, उलट तो वर त्या वधूची काळजी घेऊ शकतो हे दर्शविण्यासाठी वराच्या कुटुंबीयांनीच वधूच्या कुटूंबियांना हुंडा द्यावा लागतो.

ही परंपरा पाळण्यासाठी त्या वराला दोन्ही गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांना हुंडा द्यावा लागला. लग्नानंतर दोन्ही नववधू खरोखरच एकमेकींशी चांगल्या प्रकारे वागतात.

एकविसाव्या शतकात रोमँटिक संबंधांचे बरेच प्रकार आपण पाहिले आहेत, पण हे मात्र त्यापैकी अजिबात नाही !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *