आयपीएलमध्ये अंपायरला किती पगार मिळतो माहिती आहे का?

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) पुन्हा एकदा दहा संघांमध्ये सामना रंगताना बघायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आयपीएलमधील संघ संख्या ८ वरून १० करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या नव्या दोन संघांसाठी टाटा ( रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप ( अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका ( पुणे) या कॉर्पोरेट्समध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

आयपीएलने देशातील युवा खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून अनेक खेळाडूंनी निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधले आणि भारतीय संघात देखील स्थान मिळवले.

इंडियन प्रीमिअर लीगने युवा खेळाडूंना गुणवत्ता दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याचबरोबर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. आयपीएलने अनेक अनोळखी खेळाडूंना जगासमोर आणण्याचं काम केलं आहे. फक्त भारतीय संघालाच नाही तर इतर देशांना देखील आयपीएलने खेळाडू दिले.

भारताचे सध्याचे आघाडीचे खेळाडू जसप्रीत बुमहरा आणि हार्दिक पांड्या हे देखील आयपीएलनेच दिलेले रत्न आहेत. आयपीएल दरम्यान करोडो देशात होते. आयपीलशी निगडित सर्वांनाच मालामाल होण्याची संधी देखील मिळाली. अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोल्या लागल्या. आयपीएलने फक्त खेळाडूंनाच मालामाल केले असे नाही.

आयपीएलमध्ये सामनाधिकारी आणि पंच(अंपायर) यांना देखील मालामाल बनवले आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या २०१९ च्या हंगामात पंच आणि सामनाधिकारी यांना किती मानधन देण्यात आले याची यादी जाहीर केली आहे.

यावर्षीच्या हंगामात अंपायरना आणि सामानाधिकारी यांना भरघोष पगार मिळत असल्याचे या यादीतून समोर आले आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार भारताचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ सर्वाधिक मानधन घेणारा सामनाधिकारी ठरला आहे. सामनाधिकारी राहिलेल्या श्रीनाथला या हंगामात ५२ लाख रुपये मानधन देण्यात आले.

श्रीनाथ यांच्यानंतर एस रवी यांना ४२ लाख रुपये, मनू नायर यांना ४१ लाख रुपये, सी. शामसुद्दीन यांना ४१ लाख रुपये, नंदन यांना ३७ लाख रुपये, अनिल दांडेकर यांना ३२ लाख रुपये, यशवंत बर्डे यांना ३२ लाख रुपये आणि नारायणकुट्टी व्ही यांना ३२ लाख रुपये मानधन यावर्षी मिळाले.

२०१९ च्या हंगामात युवा खेळाडूंवर देखील पैश्यांच्या मोठ्या बोली लागल्या होत्या. भारताचा उदयोन्मुख गोलंदाज जयदेव उनाडकतवर सर्वात मोठी बोली लागली होती. उनाडकतला ८.४ कोटी रुपयात राजस्थान रॉयल्सने खरेदी केले होते. तर वरून चक्रवर्ती याला किंग्स इलेव्हन पंजाबने ८.४ कोटीलाच खरेदी केले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *