आतापर्यंत २६ आय ई डी बॉ म्ब शोधून लैलाची अशी घेतली जाते काळजी..

काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यां नी NH-44 रस्त्यावर केलेल्या आय ई डी बॉ म्बस्फोटात CRPF चे ४० जवान शहिद झाले होते. जवानांवरील त्या हल्ल्याने आजही देशातील लोकांच्या मनात राग आणि संतप्त भावना आहेत. यानिमित्ताने बॉ म्ब डिटेक्टर यंत्रणेबद्दलही चर्चा झाली.

वेळीच बॉ म्बचा तपास लागल्यास मोठमोठ्या दुर्घटना टाळता येतात, सोबतच कित्येक लोकांचा जीवही वाचवता येतो. आज आपण अशाच एका जीवनदात्री विषयी वाचणार आहोत, जिने बॉ म्ब शोधून कित्येक जवानांचा जीव वाचवला आहे.

आतापर्यंत २६ आय ई डी विस्फो टके शोधून हजारो जवानांचा जीव वाचवणारी लैला

लैला ! बॉ म्बशोधक पथकातील एक श्वान ! CRPF च्या वेगवेगळ्या बटालियनसाठी काम करणाऱ्या “लैला” या लॅब्रेडोर प्रजातीच्या श्वानाने मागच्या आठ वर्षांत CRPF च्या 110, 130, 90 आणि 146 अशा वेगवेगळ्या बटालियनमध्ये काम करताना २६ हुन अधिक प्रसंगी आय ई डी बॉ म्ब शोधून मोठमोठ्या दुर्घटना आणि जवानांवरील ह ल्ले टाळले आहेत. ही लैला आज CRPF च्या 130 बटालियनमध्ये काम करते. लैलाची व्यवस्था संदीप नावाचे जवान पाहतात.

जमिनीच्या आत पुरलेले आय ई डी बॉ म्बही शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाते

CRPF चे अधिकारी सांगतात, “जमिनीत लपवून ठेवलेले आय ई डी बॉ म्ब शोधणे लैलासाठी अवघड गोष्ट नव्हती, म्हणूनच कदाचित पुलावामामध्ये हल्लेखोर गाडीमध्ये वि स्फोटके घेऊन आले होते. लैलाच्या जोडीला NH-44 च्या १३५ किमी आसपासच्या भागात ४५ अजून बॉम्बशोधक श्वान निगराणीवर आहेत. या बॉ म्बशोधक श्वानांना काश्मीरमध्ये आणण्यापूर्वी कर्नाटकमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यात त्यांना वाट पाहणे, वि स्फोटक शोधणे, सॅल्यूट करणे आणि भुंकण्याच्या विशेष प्रशिक्षणाचा समावेश आहे.

त्यांच्या खाण्यापिण्यावरही विशेष लक्ष ठेवले जाते. त्यांना दररोज चार अंडी आणि ६५० ग्रॅम मटन दिले जाते. काश्मीरमध्ये CRPF च्या तुकड्या पाठवण्यापूर्वी संबंधित मार्गावर हे श्वान फिरवले जातात. हे प्रशिक्षित श्वान इतके हुशार असतात की आपल्या ट्रेनरच्या आदेशाशिवाय काहीच करत नाहीत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *