भारत पाकिस्तान युद्ध होणार ? टीव्ही मुलाखतीत पाकिस्तानी मंत्र्यांनी सांगितला दिवस

भारत पाकिस्तान परिस्थिती सध्या गंभीर झाली आहे. पाकिस्तानला या अगोदर भारताने धूळ चारलेली आहे परंतु पाकिस्तानची हेकड वृत्ती अजून कमी नाही झाली आहे. इम्रान खान यांनी भारताला अ ण्वस्त्र युद्धाची धमकी दिल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा युद्धाची भविष्यवाणी केली आहे. यावेळी त्यांनी युद्धाची तारीखही सांगितली आहे.

संयुक्त राष्ट्र संघात पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा दौरा करणार असून शेवटच्या श्वासापर्यंत पाकिस्तान काश्मीरसाठी लढत राहणार असल्याचा दावा शेख रशीद यांनी केला.

रशीद शेख हा वाचाळवीर आहे या अगोदर लंडन येथे झालेल्या कार्यक्रमात त्याच्यावर अंडी फेकण्यात आली होती. त्यासोबतच त्याला मारहाण देखील झाली होती. तो पाकिस्तान सरकार मध्ये रेल्वे मंत्री आहे. त्याच्यावर झालेल्या या हल्ल्याची जवाबदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जोडलेल्या पीपल्स यूथ ऑर्गनाइजेशन यूरोप चे अध्यक्ष आसिफ अली खान आणि ग्रेटर लंदन शाखा चे अध्यक्ष समाह नाज़ यांनी घेतली होती.

या अगोदर रशीद खान याने सांगितले होते कि कलम ३७० हटविल्यास भारत पाकिस्तान मध्ये अण्वस्त्र युद्ध देखील होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधान केलं होतं की, जर भारताने पाकव्याप्त काश्मीरवर ह ल्ला केला तर भारतीय उपखंडातील ते सर्वात मोठं यु द्ध असेल आणि त्यामुळे याचा पूर्ण नकाशा बदलेल असा इशारा दिला होता.

पाकिस्तान आणि भारतादरम्यान संपूर्ण ताकदीनिशी युद्ध होणार असून ते ऑक्टोबर किंवा त्यानंतरच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी बुधवारी भाकीत वर्तवले आहे. ‘पाकिस्तान टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अशातच आज शेख रशीद यांनी सांगितल्यानुसार पाकिस्तानने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा हवाला देत पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र संघात काश्मीर मुद्दा उचलला आहे. काश्मीरमधील लोकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मात्र यावरून राहुल गांधी यांनी ट्विट करत पाकिस्तानला फटकारले आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. पाकिस्तान अथवा कोणत्याही इतर देशांनी काश्मीर प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा काहीही संबंध नाही, काश्मीरात जो काही हिंसाचार सुरू आहे त्याच्यामागे पाकिस्तानच आहे असं राहुल गांधींनी सांगितले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *