औषधाच्या पॅकेटवर लाल रंगाची रेषा का असते ?

रोजच्या धकाधकीच्या जीवनातील धावपळीमध्ये माणसांना सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी सारखे आजार होत असतात. त्यावर इलाज म्हणून आपण मेडिकलमधून औषधी गोळ्या घेतो.

पण आपण मेडिकलमधून ही औषधे खरेदी करत असताना कधी बारकाईने पाहिले असेल तर तर तुमच्या लक्षात येईल, की या गोळ्यांच्या पॅकेटवर पाठीमागच्या बाजूला एक लाल रंगाची रेष असते. त्या रेषेवर Rx, NRx आणि XRx अशी अक्षरे लिहलेली असतात. त्यामागे काय कारण असते ते या जाणून घेऊया…

औषधांच्या पॅकेटवर असणाऱ्या लाल रेषेचा नेमका अर्थ काय असतो ?

छोट्या छोट्या आजारांनी ट्रस्ट असल्यावर माणसं मेडिकल मधून अँटिबायोटिक औषधे घेता, त्याने लवकर आराम मिळतो. ही औषधे बॅक्टरियल इन्फेक्शन म्हणजेच जिवाणूंच्या संक्रमणापासून रोखण्यासाठी मदत करतात.

अशा औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेषा असते. या लाल रेषेचा अर्थ असा की ती औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय न विकली जाऊ शकतात ना खरेदी केली जाऊ शकतात. अँटिबायोटिक औषधांचा चुकीचा उपयोग होऊ नये यासाठी त्या औषधांच्या पॅकेटवर लाल रंगाची रेषा असते. त्यामुळे ही औषधे इतर औषधांपासून वेगळी असतात.

औषधांच्या पॅकेट्च्या लाल रेषेवर लिहलेल्या Rx, NRx आणि XRx यांचा अर्थ काय ?

औषधांच्या पॅकेटवर असणाऱ्या लाल रेषेवर Rx, NRx आणि XRx अशी अक्षरे लिहलेली असतात. त्यामागे विशिष्ट अर्थ असतात. Rx चा अर्थ आहे, की हे औषध डॉक्टरांनी दिलेले औषध आहे. हे औषध त्याच रुग्णाला दिले जाते, ज्याला डॉक्टरांनी आपल्या चिट्ठीवर लिहून दिले आहे.

NRx चा अर्थ आहे, हे औषध तेव्हाच विकले जाऊ शकते जेव्हा ते अशा कुठल्या डॉक्टरांनी (उदा.मनोचिकित्सक, भूलतज्ज्ञ) चिट्ठीवर लिहून दिले असावे ज्याच्याकडे मादक औषधी संबंधी लायसन्स असेल. XRx चा अर्थ आहे, हे एक असे औषध आहे, जे तुम्ही भूलतज्ञ डॉक्टरांना विकू शकता आणि डॉक्टर ते रुग्णाला देऊ शकतात. हे औषध थेट रुग्णाला मेडिकलमधून विकले जात नाही, भले त्याच्याकडे डॉक्टरांची चिट्ठी असेल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *