कलम ३७० विषयी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या पाकिस्तानी राष्ट्रपतींना ट्विटरची नोटीस

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या बुडाला लागलेली आग काय शांत व्हायचं नाव घेत नाही. पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांपासून ते खेळाडू, कलाकार रोज भारताविरुद्ध गरळ गाळत आहेत. पण त्यांना कुणी विचारायलाही तयार नाही.

एवढेच नाही युनायटेड नेशन्सने सुद्धा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. एवढे सगळे होऊनही सोशल मीडियातून त्यांचं आग ओकणं सुरूच आहे. खुद्द पाकिस्तानचे राष्ट्रपतीही यात सहभागी आहेत. पण ट्विटरला आलेल्या रिपोटनुसार नुकतेच त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना ३७० कलमाबद्दलच्या ट्विटविषयी नोटीस नाथवली आहे.

काय बोलले होते पाकिस्तानी राष्ट्रपती ?

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी २४ ऑगस्टला दिड मिनिटांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओसोबत त्यांनी लिहले होते की, “कर्फ्यू, बंदी, ब्लॅकआउट्स, अश्रूधूर आणि गोळीबार असूनही हे कालचे श्रीनगर आहे.

कुठल्याही प्रकारचा अत्याचार आणि क्रौर्य काश्मिरींचा भारताविरूद्धचा रोष दडपू शकणार नाही. त्यांना कोणत्याही किंमतीत स्वातंत्र्य हवे आहे. कृपया रीट्वीट करा आणि जगाला कळवा.” त्यांच्या या ट्विटला हा लेख लिहीपर्यंत ९५१० रिट्विट आणि १७२१० लाईक्स आल्या आहेत.

ट्विटरने पाठवली पाकिस्तानी राष्ट्रपतींना नोटीस

पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या या ट्विटमुळे समाजात अशांतता आणि सामाजिक तेढ निर्माण होत असल्याबद्दल अज्ञात व्यक्तीने ट्विटला रिपोर्ट केले आणि ट्विटरला त्यावर कारवाई करण्याची विनंती केली.

त्यानुसार ट्विटरने पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या ट्विटची चौकशी करून ट्विटरच्या नियमानुसार त्यात तेढ निर्माण करणारे काही नसल्याचे सांगितले आहे. परंतु पाकिस्तानमधील मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी या नोटीसचा स्क्रिनशॉट घेऊन ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ट्विटरवर भेदभाव बाळगत असल्याचा आरोप केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *