खरच हे फोटो अमेझॉनच्या जंगलातील आहे का ?

अमेझॉन जंगल पृथ्वीचे फुफुस म्हणून ओळखल्या जाते. अमेझॉनचं जंगल हा जगाच्या ऑक्सिजनसाठीचं माहेरघर आहे असं अनेक ठिकाणी म्हटलं गेलं. बीबीसी रिअलिटी चेक टीमने हा आकडा नक्की काय याची शहानिशा केली. जगात असलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन अमेझॉन जंगलांमधून निर्माण होत असल्याचं म्हटलं जातं. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हा आकडा सांगितला. मात्र हे प्रमाण 10 टक्के असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून ऑक्सिजन बाहेर पडतो.

अमेझॉनच जंगल गेल्या 16 दिवसांपासून जळत होते. ब्राझीलमधील जंगलात ही आग पसरली असून गेल्या 15 दिवसांत 9 हजारहून अधिक वणवे पेटले आहेत. अमेझॉनमध्ये जुलै ते ऑक्टोंबर या काळात उन्हाळा असतो. या महिन्यांमध्ये वणवा पेटण्याच्या घटना घडत असतात. मात्र सध्या लागलेली आग प्रचंड असून दिवसाही गडद रात्रीसारखं वातावरण झालं आहे. ब्राझीलमध्ये 20 ऑगस्टपासून आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

अनेक सेलिब्रेटिंनी जंगल जळतानाचे फोटो अपलोड करून चाहत्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. परंतु हे करताना त्यांनी त्या फोटोची पडताळणी केली देखील नाही. फोटो सर्च करण्याकरिता आपण गुगल रिव्हर्स इमेजचा वापर करू शकतो. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे फोटो कुठचे आहे हे बघू शकतो.

वायरल झालेले बहुतांश फोटो हे अमेझॉनचे नाही आहेत काही फोटो तर ३० वर्ष जुने देखील वायरल झालेले आहेत. यांपैकी काही जूने आणि काही इतर ठिकाणचे आहेत. असे असले तरी अ‍ॅमेझॉनच्या जंगलात पेटलेल्या वणव्याची बातमी खरी आहे. या अगोदर देखील या जंगलात आग लागलेली आहे.

आगीत भस्मसात झालेलं जंगल पुन्हा उभं राहण्यासाठी २० ते ४० वर्षांचा कालावधी लागेल. आगीमुळे नुकसान झालं आहे. मात्र तरीही ८० टक्के जंगल शाबूत आहे. कोपर्निकस मॉनिटरिंग सर्व्हिसनुसार आगीमुळे 228 मेगाटन कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन झालं आहे. आगी पूर्णपणे निवळल्यानंतर आगीमुळे झालेलं नुकसान स्पष्ट होऊ शकेल.

ब्राझीलमधील पत्रकार सिलो बोकनेरा यांच्या मते देशातील जंगलाला काही ठिकणी आग लागणं सामान्य असतं मात्र अॅमेझॉनमध्ये सध्याची वनांला लागलेली आग जाणीवपूर्वक आहे. मोठ्या उद्योगसमूहांऐवजी छोट्या गटांनीच आग लावण्याचं काम केलं आहे. जाणीवपूर्वक लावण्यात आलेल्या आगी हा पारंपरिक प्रश्न आहे.

वरील सर्आव फोटो हे जुने किंवा इतर ठिकाणचे आहे. त्यांच्या सध्याच्या वणव्यासोबत संबंध नाही आहे. हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *