या दोन चमत्कारांमुळे मदर तेरेसांना ख्रिश्चन धर्मातील संत ही पदवी मिळाली

कोण होत्या मदार तेरेसा ?

२६ ऑगस्ट हा मदर तेरेसा यांचा जन्म दिवस ! अगनेस गोंझा बोयाजिजू असे त्यांचे मूळ नाव असून भारतात स्थायिक झालेल्या त्या एक अल्बेनियन महिला होत्या. १९२९ मध्ये “रोमन कॅथलिक नन” म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून त्या भारतात आल्या. त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. नंतर त्यांचे नामकरण “सिस्टर मदर तेरेसा” असे करण्यात आले. १९५० मध्ये त्यांनी “मिशनरीज ऑफ चॅरिटी” संस्थेची स्थापना केली. १९९७ मध्ये मदर तेरेसांचे निधन झाले.

मानवतेच्या कार्याबद्दल मिळाला नोबेल पुरस्कार

मदर तेरेसांनी आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असहाय्य लोकांच्या मदतीकरता घालवले. गरीब आणि आजारी लोकांना जेवण, उपचार आणि त्यांची सेवा करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले. जागतिक पातळीवर त्यांनी स्वतः युद्धमुनीवर फिरून इस्राईल आणि पॅलेस्टाईनच्या सैनिकांमध्ये तात्पुरता समझोता घडवून आणला होता. इथिओपियमध्ये भूकबळीचा प्रश्न त्यांनी हाताळला. त्यांनी रशियातील चेर्नोबिल अणूदुर्घटनेतील लोकांना तिथे जाऊन आधार दिला. १९७९ मध्ये त्यांना नोबेल आणि १९८० मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला.

संतपद बहाल करण्यासाठी ही असावी लागते पात्रता

व्हॅटिकन सिटी येथील ख्रिश्चनांच्या पवित्र चारच्या अनुसार संत पदवी मिळण्यासाठी दोन चमत्कार केलेले असणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीला संतपद बहाल करण्याची मागणी असेल त्याच्या मृत्यूच्या ५ वर्षांनंतर चर्चकडून त्याच्या चमत्काराचा शोध घेण्यात येतो.

पण मदर तेरेसा यांच्याबाबतीत हा नियम मोडण्यात आला. व्हॅटिकनने अजून एक नियमात बदल केला आहे, सर्वसाधारणपणे चमत्कार शोधल्याच्या ५० वर्षानंतर संतपद दिले जाते, पण मदर तेरेसांच्या बाबतीत हा नियम मोडत २०१६ मध्ये त्यांना संतपद बहाल करण्यात आले.

या दोन चमत्कारांबद्दल मदार तेरेसांना संतपद बहाल करण्यात आले

१) १९९७ मध्ये आपल्या मृत्यूनंतर मदर तेरेसा यांनी २००२ मध्ये मोनिका बसेरा नावाच्या मुलीच्या पोटातील ट्युमर बारा केला होता. मोनिकाने मदर तेरेसांचे लॉकेट आपल्या पोटावर ठेवले होते. मोनिकाच्या मते लॉकेटमधून प्रकाश निघाला आणि तिचा ट्युमर हळूहळू बारा होत गेला.

२) २००८ मध्ये ब्राझील येथील एका व्यक्तीने सांगितले की मदर तेरेसांमुळे त्याच्या मेंदूतील ट्युमर बरे झाले आहेत. या दोन चमत्कारांमुळे मदार तेरेसांना व्हॅटिकन सिटीतील चर्चच्या पोपने संतपद बहाल केले.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *