स्व. सुष्मा स्वराज, अरुण जेटली यांचा मृत्यू या गोष्टीमुळे झाला स्वध्वी प्रज्ञा यांचा अजब दावा

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपा कार्यालयात सोमवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा नेते बाबूलाल गौर यांच्यासाठी श्रद्धांजली सभा ठेवण्यात आली होती. यात प्रदेश भाजपाच्या नेत्यांनी दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या दरम्यान भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनीही भाजपा नेत्यांबाबत शोक व्यक्त भाजपा नेत्या साध्वी प्रज्ञा देखील हजर होत्या.

साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कछवाहा गावात झाला होता. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेलली आहे. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा उजव्या विचारांकडं होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत. एनआयए कोर्टाने २०१६मध्ये साध्वीसह अन्य आरोपींना ‘मोक्का’ कायद्याखालील आरोपांतून मुक्त केले, मात्र त्याचवेळी ‘युएपीए’खालील आरोप कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने या कायद्याखाली आरोपही निश्चित केले आहेत आणि त्यानुसार सध्या खटला सुरू आहे.

नेहमी काहीना काही वादाच्या भोवताल साध्वी राहतात यावेळेस शहीद हेमंत करकरे यांच्या वर केलेल्या टीकेमुळे संपूर्ण भारतातून टीका झाली यानंतर त्यांनी हे बयान मागे घेतले. वैयक्तित मत असे त्यांनी सांगितले. परंतु या वेळेस त्यांनी अजब शोध लावला आहे. त्या सांगतात कि,

जेव्हा मी लोकसभा निवडणूक लढवत होते. तेव्हा मला एक महाराज भेटले. ‘विरोधीपक्षातील नेते तुमच्या पक्षातील नेत्यांवर वाईट शक्तिचा प्रयोग करत आहेत. त्यामुळे तुम्ही सावध रहा. हा निर्वाणीचा इशारा मला महाराजांनी दिला आणि त्यानंतर मी मधल्या काळात तो विसरलेही. मात्र आज मला महाराजांनी सांगितलेली गोष्ट लख्ख आठवली. तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ पण महाराजांनी सांगितलेलं आज खरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.’असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे.

त्यांच्या मते काही जादूटोणा करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मारायचं काम विरोधक करत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *