..दिलीप कुमार आणि जेआरडी टाटा यांची विमानातील “ती” मुलाखत विनम्रतेचा आदर्श होती

हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीप कुमार यांना ओळखले जाते. १९६० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर दिलीप कुमार यांचा दबदबा होता. भारतातील लोक दिलीप कुमारांचे प्रचंड चाहते होते. तो काळ म्हणजे दिलीप कुमार यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. मुगल-ए-आझम, दीदार, आन, देवदास यासारखे त्यांचे चित्रपट गाजले होते. त्याच काळात दिलीप कुमारांसोबत घडलेला एक आगळावेगळा प्रसंग “टाइम्स नाऊ” ने पुढे आणला होता. पाहूया काय होते प्रकरण…

…आणि त्यांनी दिलीप कुमारांकडे पाहिलेही नाही

प्रसिध्दीच्या शिखरावर असतानाच्या काळात एके दिवशी दिलीप कुमार विमानाने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारी एक साधारण शर्ट पॅन्ट घातलेली वयस्कर व्यक्ती बसली होती. ती व्यक्ती दिसायला मध्यमवर्गीय होती पण शिकलेली वाटत होती. तिथले विमानातील सगळे प्रवासी मागे वळून वळून दिली कुमारांकडे बघत होते, पण या गृहस्थांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. ते वर्तमानपत्र वाचत होते आणि खिडकीतून बाहेर बघत होते.

चहा आल्यानंतर त्यांनी शांतपणे चहा घेतला. त्यानंतर दिलीपजींनी त्या व्यक्तीकडे पाहून स्मितहास्य केले आणि सिनेमाबद्दल विचारले. यावर त्या व्यक्तीने आपण खूप कमी सिनेमा बघतो आणि खूप वर्षांपूर्वी एक पाहिला होता असे उत्तर दिले. जेव्हा दिलीपजींनी त्यांना सांगितले आपण चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्यांचे “खूपच छान” अशा दोन शब्दात कौतुक केले.

कोण होती ती वयस्कर व्यक्ती ?

जेव्हा विमान खाली उतरले तेव्हा दिलीप कुमार आणि त्या व्यक्तीने हातात हात मिळवले. त्यांनतर दिलीप कुमारांनी त्यांना आपले नाव सांगितले. यावर ती व्यक्ती उच्चारली, “धन्यवाद, माझे नाव जेआरडी टाटा आहे.” १४ वेगवेगळ्या एंटरप्राइजसोबत जेआरडी टाटांनी “टाटा ग्रुप”ची सूत्रे हाती घेतली होती, त्यात त्यांनी ८१ एन्टरप्रायजेसची भर घातली.

आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती जेआरडी टाटा आहेत हे दिलीप कुमारांना माहित नव्हते. दिलीप कुमारांच्या चरित्रात सुद्धा या घटनेचा उल्लेख आहे. त्यात ते म्हणतात, “तुम्ही कितीही मोठे झालात तरी असं कुणीतरी असतं जे तुमच्याहून मोठे आहे. म्हणून माणसाने नेहमी विनम्रता ठेवावी, त्यात तुमचे काही नुकसान नाही.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *