राजीव गांधींप्रमाणेच या प्रसिद्ध ५ भारतीयांनी निवडला परदेशी जोडीदार

राजीव गांधी हे १९८४ ते १९८९ च्या दरम्यान भारताचे प्रधानमंत्री होते. राजकारणात येण्यापूर्वी ते पायलट होते. राजीवजी आणि सोनियाजी यांची प्रेमकहाणी प्रसिद्ध आहे. राजीवजींची आणि इटलीच्या “एंटोनिया माइनो” म्हणजेच सोनियांची पहिली भेट केम्ब्रिज विद्यापीठातील एका ग्रीक रेस्टोरंटमध्ये झाली होती.

तेव्हापासून त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि १९६८ मध्ये दोघांनी लग्न केले. परंतु केवळ राजीव गांधीच नाही तर इतरही काही प्रसिद्ध भारतीयांनी परदेशातील जोडीदार निवडला आहे. चला तर त्यापैकी काही प्रसिद्ध भारतीयांवर नजर टाकूया…

१) शशी थरूर :

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी तीन लग्न केलेली आहेत. त्यांचे पहिले लग्न १९७७ मध्ये तिलोत्तमा मुखर्जी यांच्यासोबत झाले होते. त्यांना दोन जुळी मुले झाली, पण नंतर दोघांनी घटस्फोट घेतला. २००७ मध्ये शशी थरूर यांनी कॅनडाच्या क्रिस्टा गिल्स सोबत लग्न केले, २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शशी थरूर यांनी २०१० मध्ये सुनंदा पुष्कर यांच्याशी लग्न केले. २०१४ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीच्या एका हॉटेलात मृत्यू झाला.

२) शशी कपूर :

प्रसिद्ध बॉलिवूड हिरो शशी कपूर हा कपूर घराण्यातील एकमेव असा वारस आहे ज्याने परदेशातील मुलीसोबत लग्न केले आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध इंग्लिश अभिनेत्री जेनिफर कँडल ही शशी यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचे नाटक पाहायला आली होती.

तिथे शशीची आणि तिची ओळख झाली. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. १९५८ मध्ये शशी कपूरने सोबत लग्न केले. १९८४ मध्ये जेनिफरचा मृत्यू झाला. त्यांना कुणाल, कारण आणि संजना अशी तीन मुले आहेत.

३) माधुरी दीक्षित :

बॉलिवूडमध्ये धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माधुरी दीक्षितनेही परदेशीच जोडीदार निवडला. एक वेळ होती जेव्हा संजय दत्त आणि माधुरी दीक्षित लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, परंतु नंतर संजय दत्तचे नाव मुंबई बॉम्बब्लास्ट प्रकरणात आले आणि माधुरीने त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये माधुरीने युनायटेड किंग्डमचे रहिवासी डॉ.श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

४) नीना गुप्ता :

१९८० च्या दशकात नीना गुप्ता आणि वेस्टइंडीज क्रिकेट खेळाडू सर विवियन रिचर्ड्स यांच्या अफेअर बदल बराच काळ चर्चा चालू होत्या. त्या दोघांनी लग्न न करता १९८९ मध्ये एका मुलीला जन्म दिला.

विवियन रिचर्ड यांनी नीना गुप्ताशी शेवटपर्यंत लग्न केले नाही, परंतु मसाबा नावाच्या त्यांच्या मुलीला वडिलांचे नाव दिली. मसाबा आज एक प्रसिद्ध फॅशन डिझाइनर आहे. परंतु नीना गुप्ता यांनी २००८ मध्ये वयाच्या ४९ व्या वर्षी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले.

५) सानिया मिर्झा :

सानिया ही भारताची प्रसिद्ध टेनिस खेळाडू आहे. भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिस खेळाडू म्हणून तिला ओळखले जाते. २०१० मध्ये सानियाने पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याच्याशी लग्न केले. त्यांनतर दोघांनीही दुबई येथे आलिशान घर घेतले आहे. दोघांच्याही लग्नावेळी दोन्ही देशातील लोकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली होती, परंतु त्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केले. आज दोघांनाही आपापल्या देशाचा तितकाच अभिमान आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *