काय दिवस आलेत, आता बाटलीत बंद हवाही आली विक्रीला

बंद बाटलीतून पिण्याचे पदार्थ किंवा बंद डब्यातील अन्न पदार्थ बाजारात विक्रीला येऊन आता बराच काळ लोटला आहे. ९० च्या दशकात भारतात बंद बाटलीतून पाणी विकायला सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडच्या ज्येष्ठ मंडळींनी उपहासाने सांगितले होते की, एक दिवस हवा सुद्धा बंद बाटलीतून विकायला येईल.

पण त्यांना कुठे माहित होते, की खरोखरच असे होईल. ज्या काळात बाटलीतून पिण्याचे पाणी विकत मिळेल यावर विश्वास ठेवणे कठीण होते, तेव्हापासून आजपर्यंत अनेक अविश्वसनीय गोष्टींची साखळीच तयार झाली आहे. आता त्या साखळीतील पुढची कडी म्हणजे बाटलीबंद हवा !

या कंपनीने केली बाटलीबंद हवेच्या विक्रीला सुरुवात

असं म्हणतात की निसर्गाने सर्व सजीवांना जगण्यासाठी मुबलक हवा दिली आहे. त्या हवेवर कोणताही टॅक्स नाही, त्यामुळे तिला काहीही किंमत नाही. पण आता तीच हवा विकण्याची आयडिया कॅनडामधील “वाइटलिटी एयर” या कंपनीने शोधली आहे. प्रदूषणाने ट्रस्ट असणाऱ्या देशांतील नागरिकांना समोर ठेवून या कंपनीने आपला स्टार्टअप सुरु केला आहे. या कंपनीने रॉकी पर्वतमालेतील शुद्ध हवा बाटलीबंद करून विकायला सुरुवात केली आहे.

बाटली बंद हवेची किंमत किती आहे ?

वाइटलिटी एयर कंपनीने “बॅम्फ एयर” आणि “लेक लुईस” नावाच्या दोन प्रकारच्या शुद्ध हवा विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. ऑनलाईनही विक्रीसाठी त्या उपलब्ध आहेत. ही हवा प्रत्येक कॅनमध्ये कॉम्प्रेस करून भरली जाते. मास्क लावून या शुद्ध हवेचा वापर करता येतो.

बॅम्फ एयरच्या तीन आणि आठ लिटरच्या कॅनची किंमत साधारणपणे १४५० ते २८०० रुपये आहे. याची किंमत काढली तर घरबसल्या शुद्ध हवेचा एक श्वास घेण्यासाठी तुम्हाला १२.५० रुपये मोजावे लागतील.

कशी सुचली आयडिया ?

वाइटलिटी एयर कंपनीचे संस्थापक मोझेस लेम सांगतात की, “मिनरल वॉटरची बॉटल पाहून त्यांच्या डोक्यात हवा विकण्याचा विचार आला.” त्यासाठी कंपनीने २०१४ मध्ये प्रयोग म्हणून हवेचे एक पॅकेट ऑनलाईन विकले. त्यांना त्यावेळी वाटलं नव्हतं की एक दिवस हा विचार मोठ्या व्यवसायात परावर्तित होईल.

२०१५ मध्ये कॅनडातील कॅलगरी जंगलात आग लागली असताना तिथे श्वास घेण्यासाठी अडचणी येत असताना हवेच्या कॅच मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. चीनमधील प्रदूषणामुळे त्यांना तिथे चांगले यश मिळाले आहे. आता तर तिथले लोक समारंभाच्या निमित्ताने बाटलीबंद हवा एकमेकांना गिफ्ट देतात.

भारतातही बाटलीबंद हवेचा विचार

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतात आहेत. दिल्ली त्यापैकी एक शहर ! या प्रदूषित शहरात शुद्ध ताजी हवा मिळणे अवघड होऊन बसले आहे. २०१६ मध्ये गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडियाने दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ताजी शुद्ध हवा विकण्याबद्दल एक कॅम्पेनिंग राबवले होते.

त्यानंतर “प्युअर हिमालयीन एयर” नावाची कंपनी बाटलीबंद हवा विकत आहे. त्यांच्या १० लिटर हवेच्या बाटलीची ऑनलाईन किंमत ५५० रुपये आहे, त्यात १६० शुद्ध हवेचे श्वास घेता येतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *