चिदंबरम गृहमंत्री असताना अमित शाह देखील सीबीआयपासून चार दिवस लपले होते!

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक केली आहे. २७ तासानंतर पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.

नाट्यमय घडामोडीनंतर त्यांना रात्री अटक करण्यात आली. चिदंबरम पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या जोरबाग निवासस्थानी गेले. सीबीआयटीम त्यांच्या घरी दाखल झाली. पण घराचे गेट न उघडल्यानंतर गेटवरून उड्या मारून सीबीआयचे अधिकारी त्यांच्या त्यांच्या घरात घुसले. त्यानंतर १ तासांनी त्यांना अटक करून सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले.

चिदंबरम यांच्यावर २७ तास लपल्याचा आरोप करण्यात येत होता. चिदंबरम यांना आता अटक झाली आहे आणि सध्या भारताचे गृहमंत्री हे अमित शहा आहेत. अशाचप्रकारे एकेकाळी पी चिदंबरम हे भारताचे गृहमंत्री होते तर अमित शहा यांना सीबीआयने अटक केली होती. २००५ मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसमध्ये २५ जुलै २०१० ला अमित शहा यांना सीबीआयने अटक केली होती.

चार दिवस लपले होते अमित शहा-

२००५ मध्ये गुजरातमध्ये झालेला सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसमध्ये २०१० साली अमित शहा यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. त्यावेळी सीबीआयची टीम त्यांच्या घरी गेली असता ते तिथे नव्हते. त्यानंतर चार दिवस ते लपलेलेच होते आणि नंतर ४ दिवसांनी ते गांधीनगर येथील भाजपाच्या कार्यालयात बैठकीला आले तेथे त्यांना अटक करण्यात आली.

सोहराबुद्दीनचा फेक एन्काऊन्टर केल्याचा, अपहरण, खंडणी असे आरोप शहांवर होते. तसेच या एन्काऊंटरनंतर तीन दिवसांनी त्याची पत्नी कौसर बीला ठा र करण्यात आले होते. सोहराबुद्दीन हैदराबादहून सांगलीला बसने येत होता. त्यावेळी वाटेतून त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्यावेळी अमित शहा यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना १३ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच त्यानंतर त्यांना २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

अशीच काहीशी वेळ आता तेव्हाचे गृहमंत्री असलेल्या पी चिदंबरम यांच्यावर आली असून सध्या गृहमंत्री अमित शहा आहेत. ९ वर्षांपूर्वी अमित शहागुजरातचे गृहमंत्री होते आणि चिदंबरम सध्या माजी मंत्री आहेत.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *