हे ५ हॉरर सिनेमे बघताना लोकांचा थिएटर मध्ये घाबरून झाला मृत्यू!

अनेकदा आपण ऐकतो कि हॉरर सिनेमे बघताना लोकांचा मृत्यू झाला. पण नेमके असे कोणते असे सिनेमे आहेत जे बघताना लोकांचा मृत्यू झाला हे आपणास माहिती नसेल. हॉरर सिनेमे अगोदर हॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणात यायचे. हळूहळू भारतातही चाहत्यांची संख्या बघता यामध्ये वाढ झाली आहे. बॉलीवूड आणि टॉलिवूडमध्ये अनेक असे सिनेमे आले जे बघताना लोकांना मृत्यू झाला.

मागे येऊन गेलेला एनाबेल कम्स होम बघताना एका ७७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बर्नार्ड चैनिंग हे सिनेमा बघून झाल्यानंतर लाईट लागले आणि शेजारील बाईला बघून एवढे घाबरले कि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. खासरेवर असे ५ सिनेमे बघूया हे बघताना लोकांचा मृत्यू झाला.

१. द कंज्यूरिंग २(२०१६)-

या सिनेमात लंडनमध्ये १९७७ मध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित असून त्यामध्ये पैगी नामक एका व्यक्तीच्या मुलीवर भुताचा प्रभाव असतो. हा सिनेमा भूत पकडणाऱ्या एड वारेन आणि लॉरेन वारेन यांच्या डायरीवर आधारित आहे. हा सिनेमा बघताना तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई येथे एका ६५ वर्षीय मृत्यू झाला होता.

२. राजू गारी गदी (२०१५)-

हैदराबाद मधील सी अमरनाथ या एका क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाचा हा सिनेमा बघताना मृत्यू झाला होता. त्याला हा सिनेमा कार्डियाक अरेस्ट आला होता. या सिनेमात एक भुताचा रिऍलिटी शो असतो. ज्यातून त्या बंगल्यात होणाऱ्या गोष्टींची माहिती समजेल. पण या शो मधील सहभागी झालेले स्पर्धक एक एक करून मरतात.

३. भूत(२००३)-

रामगोपाल वर्मांचा हा सिनेमा बघताना दिल्लीतील एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्याचे ह्रदय त्यावेळी बंद पडले होते. या सिनेमात मनजीत नावाच्या भुताची गोष्ट होती. जो उर्मिला मातोंडकरांच्या अंगात घुसतो. मनजीत चा ज्या फ्लॅटमधून पडून मृत्यू होतो तिथे उर्मिला आणि अजय देवगण राहायला येतात.

४. द क्रीपिंग अननोन (१९५६)-

शिकागो मध्ये थिएटर मध्ये एका प्रेक्षकाचा हा सिनेमा बघताना मृत्यू झाला होता. ९ वर्षाच्या स्टुअर्ट चा हा सिनेमा बघताना मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या पालकांना सिनेमा समजल्यानंतर कळले. स्टुअर्टचा मृत्यू हृदय बंद पडल्याने झाला होता. या सिनेमात एका अंतराळवीराची कहाणी दाखवण्यात आली आहे जो परत आल्यानंतर राक्षस बनतो.

५. राइडर ऑफ स्कल्स (१९६५)

टेक्सासच्या रॉयल थिएटर मध्ये हा सिनेमा बघताना एका व्यक्तीचा हृदय बंद पडून मृत्यू झाला होता. या सिनेमात वैंपायर दाखवण्यात आले आहेत जे लोकांवर हल्ला करतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *