रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणणाऱ्या “त्या” महिलेचा व्हायरल व्हिडीओ पाहून दहा वर्षांनंतर भेटली मुलगी

लता मंगेशकरांच्या आवाजासोबत तुलना होणाऱ्या रानू मोंडल या महिलेची वेगळी ओळख करून देण्याची आता आवश्यकता राहिली नाही. रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणताना काढलेल्या तिच्या २ मिनिटांच्या व्हिडीओमुळे ती रातोरात स्टार बनली आहे.

एवढेच नाही, तर आता तिला आता मोठमोठ्या ऑफर्सही मिळू लागल्या आहेत. या दरम्यानच तिच्या आयुष्यात एक आनंदाची मोठी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकरांच्या आवाजात गाणे म्हणणारी महिला म्हणून तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि तो व्हिडीओ पाहून आता तिची मुलगी तिला परत भेटली आहे. पाहूया हा हृदयस्पर्शी प्रसंग…

१० वर्षांपूर्वी झाली होती मायलेकींची ताटातूट

रानू आणि तिच्या मुलीची गेल्या १० वर्षांपूर्वी ताटातूट झाली होती. तेव्हापासून त्या दोघी मायलेकी संपर्कात नव्हत्या. रानू पश्चिम बंगालमधील कृष्णानगरमध्ये राहते. लहान वयातच आई वारल्याने रेल्वे स्टेशनवर आणि लोकल ट्रेनमध्ये गाणे म्हणून रानू आपला चरितार्थ चालवत होती. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणताना कुणीतरी सहज आवाज चांगला आहे म्हणून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

बघता बघता तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला. तो व्हिडीओ रानूच्या मुलीपर्यंत पोचला आणि आपल्या आईला शोधत १० वर्षानंतर ती मुलगी रानूला येऊन भेटली. हा खूपच हृदरस्पर्शी प्रसंग होता. मुलीला भेटल्यावर रानूचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी रानूने “हे माझे दुसरे आयुष्य आहे आणि मी ते अधिक चांगले बनवेल” अशी प्रतिक्रिया दिली.

रानू मोंडलला येत आहेत मोठमोठ्या ऑफर्स

रानूचा मधुर आवाजात गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती रातोरात स्टार बनली आहे. लाखो लोकांनी तिचा तो व्हिडीओ आणि आवाज ऐकला आहे. त्यामुळे आता तिला मोठमोठ्या ऑफर्स येत आहेत. तिला मुंबई, केरळ आणि बांगलादेशमधूनही ऑफर्स आल्या आहेत.

बातमी अशी आहे की काही दिवसांपूर्वीच रानूचा मेकओव्हरही झाला आहे. त्यासंबंधित फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. या फोटोंमध्ये रानू गुलाबी आणि चंदेरी रंगाच्या रेशमी साडीत दिसत आहे. लवकरच रानूवर एक शो सुद्धा येत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *