राज ठाकरे यांच्या साठी जीव देणारा प्रवीण चौगुले कोण होता ? वाचा माहिती

राज ठाकरे यांच्यासाठी जीवाला जीव देणारे अनेक कार्यकर्ते आहे असे अनेक लोक सांगतात. परंतु सध्या हे सिद्ध झाले आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. प्रवीण चौगुले असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. कळवा येथील विटावा परिसरात चौगुलेच्या राहत्या घरी काल रात्री ही घटना घडली आहे.

वीण चौगुले हा मुंबईत विटावा भागात घरी एकटा राहत होता. मागील अनेक वर्षांपासून प्रवीण मनसे कार्यकर्ता आहे. काल दिवसभर प्रवीण याने राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीचा निषेध करणारी फेसबूक पोस्ट केली होती. प्रवीण अनेक मोर्च्यांमध्ये स्वतःच्या अंगावर मनसेचा झेंडा ऑईलपेंटने रंगवून घेत असे. मुळचा प्रवीण सातारा जिल्हातील असून तो कळवा येथे मित्रासोबत राहत असे.

या अगोदर प्रवीणने केला होता प्रयत्न-

यापूर्वीही चौगुले याने तीन ते चार वेळा असाच प्रयत्न केला होता. या अगोदर २०१५ ला प्रवीणने असा प्रयत्न केला होता. फेब्रुवरी २०१९ ला देखील प्रवीणने फाशी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मार्च एप्रिल मध्ये देखील त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल घेऊन असाच प्रयत्न केला होता.

तो लहान असताना त्याच्या आईने सुध्दा लहानपणी त्याच्यासारखेच आपले जीवन संपवले होते. त्याचा परिणाम प्रवीणवर झाला होता असे त्याचे मित्र सांगतात. प्रवीणचा व्यवसाय ओला वाहन चालवायचा होता. तो एकटा राहत असे. “राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे मी दु:खावलो असून जीवन संपवतोय ,” असं प्रवीणने त्याच्या मित्रांना सांगितले होते.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने म्हणून प्रवीण याने जीवनयात्रा संपवल्याची जोरदार चर्चा ठाण्यात सुरु आहे. मात्र पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अशी कोणतीही बाब समोर आलेली नाही. तसेच घटनास्थळी कोणती चिठ्ठी देखील सापडली नाही अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.

त्याचे नातेवाईक हे सर्व मनसे परिवार आहे असे सांगत त्याच्यावर कार्यकर्ते अंत्यसंस्कार करतील अशी माहिती मिळाली आहे. त्याच्या मामासोबत संपर्क झाला आहे त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार. त्याने फेसबुकवर मनसेच्या नेत्यांसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या कृत्यामुळे मनसैनिकांना फार मोठा धक्का बसला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *