या ठिकाणी महादेवांनी उघडला होता तिसरा डोळा, आजही कुंडातून निघते उकळते पाणी

असे मानले जाते की भगवान शंकर हा देवाचा देव आहे , भगवान शंकर हे शांत तेवढेच संहारक आहे असे मानले जाते की भगवान शंकराने जर आपला तिसरा डोळा उघडल्यास सृष्टिवर हाहाकार माजेल सर्व नष्ट होईल.

तर भगवान शंकराने कधी तिसरा डोळा उघडला होता का ? आपन आज भगवान शंकराच्या तिस-या डोळ्या विषयी जानुन घेऊया मणिकर्ण हे हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या सानिध्यातील एक ठिकाण तर मणिकर्ण या ठिकाणी भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला होता. अख्यायिके प्रमाणे देवी पार्वतीच्या एक दागिना क्रिडा स्नान करताना पाण्यात पडला. वाहत वाहत तो दागीना पाताळलोकात गेला.

त्यानंतर शंकरानी शोधा शोध केली पन अथक प्रयत्नानंतर सुध्दा शंकर व शिष्यानां तो दागीना काही सापडला नाही. त्यानंतर महादेवांनी लगेच आपल्या शिष्यांना बोलावून मणी शोधण्यास सांगितले. शिष्यांनी मणी शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना काहीच सापडले नाही. या प्रसंगामुळे भगवान शंकराला खुप राग आला व क्रोधा मध्ये भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला.

हे रौद्र रूप पाहून सगळे भंयकर घाबरले. त्यावेळी नैना देवी प्रकट होऊन भगवान शंकराची त्यांनी मदत केली. कारण तिसरा डोळ्या उघडल्यास सृष्टीवर हाहाकार उडतो. हिमाचल प्रदेशात मणिकर्ण ठिकाणी महादेवांनी तिसरा डोळा उघडला होता. महादेवांनी असे करण्यामागे एक कथा सांगण्यात येते.

तेव्हा पासुन हे ठिकाण नैना देवी ठिकाण म्हनुन ओळखले जाते , नैना देवीनीं पातळलोकात जाऊन शेषनागा कडून तो मनि घेऊन भगवान शंकराला दिला हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाना पासुन ४५ कि मी अंतरावर आहे हे ऐतिहासिक ठिकाण भगवान शंकराचे मंदिर व गुरूद्वारासाठी प्रसिध्द आहे तसेच या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत.

औषधी गुणधर्म असलेले पाणी

या कुंडात स्नान केल्यास व्यक्तीचे आजार बरे होतात. या पाण्यातील शिजवलेले अन्न लोक पवित्र प्रसाद समजुन खातात.

आपल्यला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *