घटस्फोटानंतर सैफने पत्नीला दिले तब्बल एवढे ‘कोटी’! चक्क सैफने हप्त्यांमध्ये चुकवली रक्कम

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. सैफ अली खानने नुकताच त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. सैफ अली खानच नाही तर त्यांचा स्टार कीड तैमूर देखील आजकाल चांगलाच चर्चेत असतो. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होते. सैफ अली खानने पहिली पत्नी अमृता सोबत घटस्फोट घेतल्यानंतर करीना कपूर सोबत लग्न केले.

सैफने अमृता सिंह सोबत १९९२ मध्ये लग्न केले होते. दोघांच्या वयात तब्बल १२ वर्षाचे अंतर होते. सैफ आणि अमृता यांचे दोन अपत्य आहेत, इब्राहिम आणि सारा अली खान. सैफने २००४ मध्ये अमृतासोबत घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर ८ वर्षांनी २०१२ मध्ये त्याने अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले.

सैफ आणि अमृताचं लग्न १३ वर्ष टिकलं आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा घटस्फोट घेतला त्यावेळी सर्वजण अवाक झाले होते. या दोघांची पहिली ओळख ‘बेखुदी’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी अमृता बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. याच सिनेमातून सैफने त्याचा बॉलिवूड डेब्यू केला होता.

दोघंही तेव्हा पहिल्यांदा भेटले कि एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एवढेच नाही तर त्यांची पहिली डेट अमृताच्या घरीच झाली होती. तो अमृताच्या घरी पोहोचला त्यावेळी अमृतानं अजिबात मेकअप केला नव्हता आणि सैफ तिच्या सिंपल लुकवर फिदा झाला होता.

हे दोघे एवढ्या प्रेमात बुडाले होते कि त्यांनी लग्नासाठी घरच्यांची परवानगी देखील घेतली नव्हती. या दोघांना नंतर दोन मुलंही झाली सारा आणि इब्राहिम. या दोघांच्या घटस्फोटाचे कारण इटालियन मॉडेल रोज असल्याचे बोलले जाते. एका परदेश दौऱ्याच्या वेळी रोज त्याच्या आयुष्यात आली आणि तीच या घटस्फोटाचं कारण बनली.

त्यानंतर एका मुलाखतीत सैफने अमृताला पोटगी म्हणून दिलेल्या रकमेचा खुलासा केला. सैफने अमृताला पोटगी म्हणून तब्बल ५ कोटी रुपये दिल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्याच्याकडे त्यावेळी एवढे पैसे नव्हते. त्यामुळे एवढी रक्कम एकदाच देणे शक्य नव्हते. त्यानंतर त्याने अमृताला हप्त्यांमध्ये पैसे दिले होते. याशिवाय इब्राहिम मोठा होईपर्यंत १ लाख रुपये देण्याचं आश्वासनही दिले होते.

सैफची मुलगी सारानं मागच्याच वर्षी केदारनाथ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर रणवीर सिंह सोबत ती सिंबामध्येही दिसली आणि पदार्पणातील तिचे दोन्ही सिनेमे हिट ठरले. सैफ-करीनाच्या लग्नाला सारा आणि इब्राहिम हजर होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *