मुंबईतील कामाठीपुरा सोडून या ठिकाणी जात आहेत वेश्या…

मुंबईचा कामाठीपुरा हा अनेक काळापासून वेश्यांसाठी साठी प्रसिद्ध आहे. अनेक लोक आपल्या शरीराची भूक भागवण्यास येथे जातात. परंतु तिथे काम करणाऱ्या महिलांची उपासमारीची वेळ येत आहे. म्हणून येथील अनेक वेश्यांना आता कामाठीपुरा सोडून इतर ठिकाणी स्थलांतरीत होत आहे.

स्थलांतरीत होण्याचे काय आहे कारण ?

सर्वात महत्वाचे कारण आहे मुंबई ज्या झपाट्याने वाढत आहे त्याच झपाट्याने महागाई देखील तिथे वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील कमी उत्पन असल्यास राहणे कठीण झाले आहे. पोलीसनामाच्या माहितीनुसार येथे काम करणारे ‘सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज इंटिगेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक विनय वत्स यांचे म्हणणे आहे की, कामठीपुरामध्ये अत्यंत कमी उत्पन्न असणारे अनेक लैंगिक कामगार आहेत. बर्‍याच महिलांना येथील महागडे भाडे परवडत नाही.

येथे राहायचे असल्यास कमीत कमी महिन्याला एका खोलीचे भाडे हे तब्बल १५ हजार रुपया पर्यंत आहे. आणि अनेक रियल इस्टेट डेवलपर या ठिकाणावर आपली नजर ठेऊन आहेत. कारण हा मुंबईच्या मौक्याच्या ठिकाणी असलेला भाग आहे.

तिथे काम करणाऱ्या अनेक महिला ह्या मुंबई उपनगरात जात आहे. अनेक वेश्या कडवली, कल्याण आणि आसपासच्या भागात राहण्यास सुरुवात केली आहे. येथून त्या रोज प्रवास करतात. कारण कुटुंब सांभाळणे या भागात त्यांना अशक्य होत आहे.

अनेक महिला कडवली, कल्याण आणि आसपासच्या भागात राहण्यास सुरुवात केली आहे. मागील २० वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात काम होत आहे त्यामुळे इथले दर हे आस्मानाला भिडले आहेत. एएनआयच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार आरती नावाच्या एका वेश्याने सांगितले की, कामठीपुरामध्ये आयुष्य जगणे कठीण होत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *