इथे आहे लाखो छिद्रांचे शिवलिंग, आख्यायिके नुसार टाकलेले पाणी जाते पाताळात

हे शिवलिंग छत्तिसगढ मधिल खरौद या ठिकाणी आहे. हे ठिकाण राजधानी रायपूर पासुन १२० कि मी आहे, असं सांगितल्या जाते की भगवान राम यानीं इथे खरं व दूषण चा वध केला होता त्यामुळे या जागेच नाव खरौद पडलं, या ठिकाणाला छत्तीसगढ ची काशी सुध्दा म्हनतात.

मंदिराच्या स्थापने बद्दल अख्खायिका

लक्ष्मणेश्वर महादेव मंदिराची स्थापना एका अख्ययिका नुसार भगवान श्रीरामाने खर आणि दूषण चा वध केल्यानंतर आपला भाऊ लक्ष्मण च्या सांगण्या वरून केली.

गाभा-यात आहे लक्षलिंग

लक्ष्मेणेश्वर महादेव मंदिर च्या गाभा-यात एक शिवलिंग आहे या बद्दल सांगीतले जाते की याची स्थापना लक्ष्मण केली होती , या शिवलिंगाला एक लाख छिद्र असल्यामुळे त्याला लक्षलिंग म्हनतात , या लाखो छिद्रा मध्ये एक छिद्र असे आहे जे पाताळगामी आहे कारण त्या मध्ये कितीही पाणी टाका त्यात समावेल , एक छिद्र अक्षय कुन्ड आहे कारण त्यात जल नेहमीच भरून असते , लक्षलिंग जमीनीपासुन साधारण ३० फुट उंचीवर आहे आणि त्याला स्वयंभू लिंग समजले जाते.

मंदिराची रचना

हे शहराच्या पश्चिम दिशेला पुर्वेकडे तोंड करून उभे आहे , मंदिराच्या चारही बाजूंना मजबूत दगडाची भिंत आहे या मध्ये ११० फुट लंबा आणि ४८ फुट रुंद पायावर भव्य मंदिर बनविन्याची योजना होती, पायाच्या वरच्या भागाला परीक्रमा म्हनतात, सभा मंडपाच्या समोरील बाजुस सत्यनारायण मंडप, नन्दी मंडप आणि भांडारगृह आहेत.

मंदिरात प्रवेश केल्या बरोबर सभा मंडप नजरेस पडते, मंदिराच्या दक्षिण भागात एक शिलालेख आहे पन त्याची भाषा अस्पष्ट असल्यामुळे वाचता येत नाही , त्यात आठव्या शतकातील इंन्द्रबल व ईशानदेव या शासकांची नावे आहेत, मंदिरात एक संस्कृत शिलालेख आहे त्या मध्ये ४४ श्र्लोक आहे.

चंद्रवंशी वंशात रतपुर च्या राजाचा जन्म झाला होता त्यांच्याच द्वारे अनेक मंदिर, मठ, तलाव, याची निर्मिती झाली रनदेव तृतीय ला राल्हा व पद्मा या दोन रान्या होत्या , राल्हा ला सम्प्रद आणि जीजाक हे दोन पुत्र होते, पद्मा पेक्षा सिंहतुल्य पराक्रमी खड्गदेव हा रतपुर चा राजा झाला त्यानेच लक्ष्मणेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला , यावरून माहिती होते की मंदिर आठव्या शतका पर्यन्त जीर्ण झाले होते.

मंदिराच्या पार्श्वभागात शिव तांडव, राम सुग्रीव मित्रता, बाली चा वध, गंगा यमुना मुर्ती आहे, मूर्ति मध्ये मकर आणि कच्छप वाहन स्पष्ट दिसतात, लक्ष्मणेश्वर महादेव मंदिरा मध्ये श्रावन महिन्यात श्रावणी आणि महाशिवरात्री मध्ये यात्रा असते .

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *