‘त्या’ बंडखोर काँग्रेस आमदाराने खरेदी केलेल्या कारची किंमत ऐकून थक्क व्हाल..

कर्नाटकमध्ये मागच्या महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ बघायला मिळाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आणि भाजपने सरकार स्थापन केले. भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना आपल्या बाजूने केले होते.

२३ जुलै रोजी काँग्रेस जेडीएसने व्हिप काढूनही त्यांच्या पक्षाचे १४ आमदार विधानसभेत हजर राहिले नाहीत. त्याच दिवशी झालेल्या विश्वासमत चाचणीत माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच सरकार ६ मतांनी पडलं. त्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले.

त्यानंतर बंडखोर १४ जणांना अपात्र ठरविण्यात आले होते. यात काँग्रेसच्या ११ आणि जनता दलाच्या (सेक्युलर) ३ आमदारांचा समावेश आहे. या बंडखोर आमदारांना भाजपने मोठी रक्कम देऊन खरेदी केल्याचे आरोप करण्यात येत होते. हे प्रकरण आता शांत होत असताना पुन्हा एकदा याची चर्चा सुरु झाली आहे.

या बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या एमटीबी नागराज यांनी एक कार खरेदी केली असून त्या कारमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कारण नागराज यांनी जी कार खरेदी केली आहे ती साधीसुधी कार नसून त्या कारची किंमत ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. नागराज यांनी अत्याधुनिक आणि अलिशान असलेली रोल्स रॉयल्स फँटम VIII खरेदी केली आहे.

या कारची किंमत तब्बल ११ कोटी आहे. या कारचा कर दिल्यानंतर तिची किंमत आणखी वाढू शकते. नागराज यांनी एवढी महाग कार खरेदी केल्याने कर्नाटकमध्ये पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. नागराज यांनी अजून कारचा कर भरला नाहीये. तो कर भरल्यानंतर हि किंमत अजून बरीच वाढणार आहे.

काँग्रेस प्रवक्ते निवेदित अल्वा यांनी ट्विट करून नागराज यांनी खरेदी केलेल्या कारची माहिती दिली. नागराज यांनी गाडी खरेदी केल्यानंतर चर्चा जरी सुरु झाल्या असल्या तरी त्यांचा गर्भश्रीमंत आमदारांमध्ये समावेश होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हि कार खरेदी करणे मोठी गोष्ट नाहीये. त्यांनी निवडणुकीवेळी एक हजार कोटींची संपत्ती जाहीर केली होती.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *